• A
  • A
  • A
वीजतंत्री तारतंत्रीला सेवेत सामावून घ्या; जालना जयहिंद इलेक्ट्रिकल्स संस्थेची मागणी

जालना - औद्योगिक प्रशिक्षण केंद्राद्वारे वीजतंत्री, तारतंत्री उत्तीर्ण झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांना तत्काळ रोजगार उपलब्ध करून द्यावा. तसेच तातडीने नोकर भरती करावी, अशी मागणी जालना जयहिंद इलेक्ट्रिकल्स स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेच्यावतीने आज पत्रकार परिषदेत करण्यात आली.


यावेळी बोलताना संचालक बाबासाहेब वानखेडे म्हणाले, की आयटीआय झालेल्या इलेक्ट्रिशियन वायरमन बेरोजगारांना तात्पुरत्या स्वरूपात कामावर घेतलेल्या कंत्राटी कामगारांना महाविद्युत वितरण कंपनीत व पारेषण कंपनीत विनाअट कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे, आयटीआय इलेक्ट्रेशियन वायरमन झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांना शिकाऊ उमेदवार म्हणून सामावून घेण्यात यावे. तसेच महाविद्युत वितरण कंपनी व पारेषण कंपनीमध्ये अपघाती निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीत घ्यावे. या मागणीसह शहीद जवान व माजी सैनिकांना वीजबिल माफ करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी केली.
यासोबत आयटीआय कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारांना मीटर रिडींगची कामे तसेच विज बिल वाटपाचे कामेही संस्थेला देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष निलेश वानखेडे यांच्यासह बाबासाहेब वानखेडे, सुधाकर चव्हाण, मकरंद वानखेडे, शरद लहाने, उमेश अंभोरे, सचिन वानखेडे उपस्थित होते.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES