• A
  • A
  • A
गुरू भक्तांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य खर्ची घालतात - राधाकृष्ण महाराज

जालना - गुरू हे असे एकमेव व्यक्तिमत्व आहे, जे २४ तास सतर्क असते, म्हणूनच त्यांना गुरू म्हणतात. त्यामुळे फक्त चातुर्मासातच त्यांची सेवा न करता बाराही महिने त्यांच्या सानिध्यात राहून आपले आयुष्याचे कल्याण करून घ्यावे, असे आवाहन राधाकृष्ण महाराज यांनी केले. श्रीराम गोभक्त सेवा समितीतर्फे गोरक्षण पांजरपोळ परिसरात आयोजित करण्यात आलेल्या श्री राम कथा सोहळ्याच्या व्यासपीठावरून ते बोलत होते.गो दानाचे महत्त्वही त्यांनी यावेळी सांगितले. जे दान आपण करतो त्यामध्ये जर सात्विकता नसेल तर त्याला काही महत्त्व नाही. सात्विकतेचे भान ठेवून आपण गोदान केले तर सत्कर्म घडेल आणि आपले आयुष्य धन्य होईल, असे महाराज यावेळी म्हणाले. भव्य प्रांगणात उभारलेल्या स्वर्गीय रामेश्वरजी लोया सभामंडपात या रामकथेचे आयोजन करण्यात आले. पुढे बोलताना राधाकृष्ण महाराज म्हणाले की, आपल्यावर नेहमी गुरूंची कृपा राहावी म्हणून आपण गुरूंची सेवा केली पाहिजे.

ज्याप्रमाणे काही औषधांच्या दुकानांवर २४ तास सेवा म्हणून लिहिले जाते आणि ते रुग्णसेवेसाठी स्वतःला वाहून घेतात. त्याचप्रमाणे गुरूदेखील भक्तांच्या आणि सेवकांच्या कल्याणासाठी आपले स्वतःचे आयुष्य खर्ची घालतात. ते २४ तास सतर्क असतात आणि भक्तांचे कल्याण करतात. त्यामुळे गुरूला शरण जावे आणि आपल्या आयुष्याचे कल्याण करून घ्यावे, असे महाराजांनी राम कथेच्या माध्यमातून सांगितले. या भव्य प्रांगणामध्ये श्रीराम कथेसोबतच विविध धार्मिक-साहित्य, देवपूजेचे साहित्य, तसेच हिंदू धर्मामध्ये असलेल्या गो सेवेचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध स्टॉलची उभारणी करण्यात आली.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES