• A
  • A
  • A
वेळ आल्यावर चोट्टे म्हणणाऱ्यांचे कान धरू, खोतकरांचा दानवेंना टोला

जालना - 'वेळ आली की चोट्टे म्हणणाऱ्यांना कुठे चिमटे घ्यायचे आणि कुठे कान धरायचे ते पाहू' असे म्हणत राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी खासदार रावसाहेब दानवेंना टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जालन्यातून मला पाडण्यासाठी देशातील सर्व चोट्टे एकत्र आल्याचे दानवेंनी वक्तव्य केले होते. दानवेंचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता खोतकर बोलत होते.




लोकसभेच्या उमेदवारीवरून जालन्यामध्ये विद्यमान खासदार रावसाहेब दानवे तसेच त्यांचे कट्टर स्पर्धक अर्जुन खोतकर हे दोघेही ऐकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. एका शासकीय कार्यक्रमानिमित्त हे दोघेही एकाच व्यासपीठावर होते. मात्र, कोणतीही टीका न करताच दोघेही कार्यक्रमातून बाहेर पडले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी खोतकरांना घेरले आणि काल खासदार दानवेंच्या वक्तव्याबद्दल प्रश्न केला. याचा समाचार घेत खोतकर म्हणाले, की जे लोक चोट्टे म्हणत आहेत त्यांचे हात, कान , कुठे धारायचे हे आम्हाला माहित आहे. ते धरु मात्र तूर्तास उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपण आलो आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शहर सोडण्यापूर्वी सूचना द्या असे सांगितले आहे. त्यामुळे कदाचित मुख्यमंत्र्यांचे एखादे शिष्टमंडळ भेटण्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या आपण म्यान झालो नसून, लोकसभेच्या रिंगणातुन माघारी आलो नसल्याचे खोतकर म्हणाले.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES