• A
  • A
  • A
रावसाहेब दानवेंसह खोतकरांचा कार्यकर्ते, पत्रकारांना पुन्हा एकदा चकवा!

जालना - राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना लोकसभा मतदारसंघात शनिवारी (२ मार्च) मोफत सर्वरोग निदान आरोग्य महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटक म्हणून खासदार रावसाहेब दानवे तर अध्यक्ष म्हणून अर्जुन खोतकर यांची उपस्थिती होती. त्यामुळे दोन्हीही नेते एकमेकांवर कुरघोडी करतील, अशी अपेक्षा कार्यकर्ते आणि पत्रकारांना वाटत होती. मात्र, पुन्हा एकदा सर्वांच्या पदरी निराशा आली.


एक मार्चला खासदार दानवे यांनी जालना विधानसभा मतदार संघातील गरीब जनतेसाठी असलेल्या आयुष्मान भारत योजनेचे कार्ड वाटप केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन, भारत सरकार, यांच्या संयुक्त विद्यमाने या मोफत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा-सेल्समनचा साक्षीदारच निघाला दरोडेखोरांचा म्होरक्या; २४ तासात आरोपीला अटक
उद्घाटनाच्या निमित्ताने व्यासपीठावर आलेल्या नेत्यांमध्ये खासदार दानवे आणि खोतकर हे दोघेच मोठे नेते होते. कालच्या खोतकर यांच्या गैरहजेरीमुळे आज ते काहीतरी बोलतील अशी अपेक्षा कार्यकर्ते आणि पत्रकारांना होती. मात्र, खासदार दानवे आणि अर्जुन खोतकर या दोघांनीही व्यासपीठावरून राजकीय भाषण टाळले आणि उपस्थित कार्यकर्ते आणि पत्रकारांना चकवा मिळाला.
हेही वाचा-आमच्या नावेही घोषणा देत जा; शिवसेनेकडून भाजपाची कानउघडणी

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES