• A
  • A
  • A
जालन्यात रथसप्तमीनिमित्त ३१ हजार सामूहिक सूर्यनमस्कार

जालना - शहरात आज पहाटे ३१ हजार सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. पतंजली योग समितीच्यावतीने जागतिक सूर्यनमस्कार दिन तथा रथसप्तमीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


बाबा रामदेव यांच्या जालना येथील योग भूमी परिवाराच्यावतीने या सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. जालना शहरातील ज्वाला लॉन्स येथे पहाटे साडेपाच ते ७ वाजेदरम्यान सूर्यनमस्कार घालण्यात आले. या कार्यक्रमात पतंजली महिला योग समिती, युवा भारत, स्वाभिमान न्यास आणि किसान सेवा समिती यांनी सहभाग घेतला होता. यावेळी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी सूर्यनमस्कार घातले.
हेही वाचा - 'खरा गांधी समजावून घेतल्यास देशात पुन्हा शांतता प्रस्थापित होईल'
यावेळी योग भूमी परिवाराचे किसन डागा, पोलीस कर्मचारी, कैलास जावळे, यांच्यासह प्रकाश सुसर, आनंद वाघमारे तसेच अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा - भाजप पदाधिकाऱ्यांचा दबाव, जालना शहर महिला आघाडीच्या सदस्यांचा सामूहिक राजीनामा

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES