• A
  • A
  • A
'खरा गांधी समजावून घेतल्यास देशात पुन्हा शांतता प्रस्थापित होईल'

जालना - महात्मा गांधींची खिल्ली उडविण्यापेक्षा त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन जगले तर निश्चितच देशामध्ये समता आणि शांतता पुन्हा प्रस्थापित होईल. त्यासाठी खरा गांधी समजावून घेऊन प्रेरणा घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार संजय मंगला गोपाळ यांनी व्यक्त केले. जे.ई.एस. महाविद्यालयात गेल्या ५ दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय गांधी विचार शिबिराच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.


हेही वाचा - जिल्हाधिकारी साहेब तुम्हीच न्याय द्या; शेळ्यांसह शेतकऱ्याचे आमरण उपोषण

ज्या क्रांतीसाठी हिंसा करावी लागते. अशा कृतीला क्रांती म्हणता येत नाही. त्यामुळेच गांधीजींनी निर्भीडपणे अहिंसेचा मार्ग स्वीकारण्यास सांगितले. त्याचसोबत व्यक्ती लहान आहे किंवा मोठा हे न पाहता निर्भीडपणे त्याच्यासोबत चर्चेच्या माध्यमातून वाद-संवाद घालून आपले विचार त्याला पटवून देता आले पाहिजेत. म्हणजेच अहिंसेच्या मार्गावर आपण चाललो आहोत असे म्हणता येईल, असे संजय गोपाळ म्हणाले. श्री सरस्वती भुवन संस्था औरंगाबादचे सचिव ज्ञानप्रकाश मोदाणी यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून गांधी अध्ययन केंद्राला दरवर्षी २५ हजार रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले.

हेही वाचा - आधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा, नंतरच जिल्ह्यात पाय ठेवा - शिवाजीराव मोघे

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानप्रकाश मोदाणी, जे. इ. एस. महाविद्यालयाचे सचिव श्रीनिवास भक्कड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टरजवाहर काबरा, गांधी अध्ययन केंद्राचे संचालक डॉक्टर यशवंत सोनुने, सहसंचालक प्राध्यापक डॉक्टर महावीर सदावर्ते, राष्ट्रीय युवा संघटन (वर्ध्या)चे मनोज ठाकरे यांची उपस्थिती होती.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES