• A
  • A
  • A
भाजप पदाधिकाऱ्यांचा दबाव, जालना शहर महिला आघाडीच्या सदस्यांचा सामूहिक राजीनामा

जालना - भाजप पदाधिकारी दबाव टाकत असल्याचा आरोप करत महिला आघाडी मोर्चाच्या शहर पदाधिकाऱ्यांनी संयुक्त राजीनामा दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेले या राजीनामासत्र वेगळ्याच वळणावर जाण्याची चिन्हे आहेत.


हेही वाचा - आम्ही राफेलप्रकरणी मोदींवर केलेले आरोप खरे ठरले - राहुल गांधी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यात भाजपची वाटचाल सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या नावाखाली जिल्हास्तरीय पदाधिकारी दुय्यम वागणूक देऊन विविध प्रकारचा दबाव आणत असल्याचा आरोप या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. नवीन महिलांना घेऊन त्यांना पदे देणे आणि जुन्या महिला कार्यकर्त्यांवर नवीन महिलांसोबत जुळवून घ्यायला सांगणे तसेच अनेक वेळा कामांबाबत दुजाभाव सुरू असल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. त्यामुळे शहर मोर्चाच्या शहराध्यक्ष विजया बोरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या सोबत अन्य महिला सदस्यांनी देखील सामूहिक राजीनामा दिल्यामुळे हे प्रकरण चांगलेच पेटण्याच्या मार्गावर आहे.

हेही वाचा - शरद पवारांनी माढ्यातूनच निवडणूक लढवावी, बैठकीत कार्यकर्त्यांचा आग्रह

राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये सचिव ममता कोंड्याल, सहसचिव अंजली कुलकर्णी, सोशल मीडिया अश्विनी जैन, तर सदस्यांमध्ये निर्मला नरवडे, वंदना साळवे, शोभा शिंदे, लक्ष्मी नरवाडे, छाया वाळ, आणि प्रतिभा लांडगे यांचा समावेश आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES