• A
  • A
  • A
पोटगीचा दावा केल्याने विवाहितेसह कुटुंबाला जातपंचायतीने केले बहिष्कृत; लग्नमंडपातून काढले बाहेर

जालना - जातपंचायतीने तुमच्या कुटुंबाला वाळीत टाळले आहे, असे सांगून लग्नमंडपातून बाहेर काढल्याची घटना समोर आली आहे. या विरोधात पीडित महिलेने भोकरदन तालुक्यातील राजूर पोलीस ठाण्यामध्ये ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


या प्रकरणातील तक्रारदार महिलेने कौटुंबिक वाद पोलीस ठाण्यात नेऊन पोटगीचा दावा न्यायालयात दाखल केला आहे. त्यामुळे वैदू समाजाने जातपंचायत भरवून या कुटुंबाला बहिष्कृत केले. २००९ मध्ये या तरुणीचा विवाह सिंदखेड राजा येथील ज्ञानेश्वर अण्णा राजे याच्यासोबत वैदू समाजाच्या विवाह पद्धतीने पार पडला. मात्र, त्यानंतर तिला वारंवार त्रास होत असल्यामुळे तिने सासरच्या मंडळींविरुद्ध पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या समाजाच्या मंडळींनी पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे जातपंचायत भरवून या महिलेच्या कुटुंबीयांना जातीबाहेर काढले.

हेही वाचा - खऱ्या अर्थाने 'जगण्याची कला' शिकलेले एदलापूर गाव
दरम्यान, या समाजाचा २५ जानेवारीला अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे एक विवाह सोहळा होता. या विवाहाला या पीडित महिलेसह तिचे आई-वडील भाऊ आणि अन्य काही नातेवाईक गेले होते. त्यावेळी या समाजाच्या काही प्रमुख मंडळींनी संगनमत करून या कुटुंबाला "तुम्हाला आम्ही जातीच्या बाहेर काढले आहे" असे म्हणून लग्नासाठी अक्षता देऊ दिल्या नाहीत. तसेच जेवण करण्यासही विरोध केला आणि लग्न मंडपाबाहेर काढून दिले.


हेही वाचा - पोलीस अधीक्षक कार्यालयातील लाचखोर लिपिक अटकेत
हा अपमान सहन न झाल्याने महिलेच्या तक्रारीवरून जात पंचायतीच्या तात्या रामा शिवरकर (रा. देऊळगाव राजा. जिल्हा बुलढाणा) अण्णा मल्लू गोडवे (रा. देवळा. तालुका चिखली), मोतीराम चव्हाण शामराव शिंदे, बाळासाहेब लोखंडे (सर्वजण रा. वैदुवाडी. तालुका जामखेड), नाना शिंदे (रा. शेलगाव. वखारी), दाजीराम इंदापूर, या ७ जणांविरुद्ध महाराष्ट्र जात पंचायत अधिनियम कायद्यान्वये राजूर पोलीस चौकी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES