• A
  • A
  • A
प्रगत समाज निर्माण करण्यासाठी गांधी विचारांची गरज - यशवंत भंडारे

जालना - आज तरुणांच्या मनावर आणि विशेषतः त्यांच्या विचारांवर एका विशिष्ट जाती धर्माचा पगडा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, ते विचार हाणून पाडण्यासाठी आणि प्रगत समाज निर्माण करण्यासाठी गांधी विचारांची गरज आहे, असे मत विभागीय माहिती संचालक यशवंत भंडारे यांनी गुरुवारी जालना येथे व्यक्त केले.


जालना एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या १५ व्या राज्यस्तरीय गांधी विचार अभ्यास शिबिरात ते बोलत होते. यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया, सचिव श्रीनिवास भक्कड, राष्ट्रीय किसान संयोजन समितीचे संयोजक विवेकानंद माथने, महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर काबरा, मनोज ठाकरे, गांधी अध्ययन केंद्राचे संचालक डॉक्टर यशवंत सोनुने, सहसंचालक प्राध्यापक डॉक्टर महावीर सदावर्ते यांची उपस्थिती होती.
हेही वाचा - जालन्यात पार पडणार काँग्रेसचे 'संवाद कार्यकर्ता शिबिर'
१५ व्या राज्यस्तरीय गांधी विचार अभ्यास शिबिरात "आजच्या संदर्भात गांधी विचार आणि युवा" या विषयावर पुढील ५ दिवस हे निवासी शिबिर चालणार आहे. आज पहिल्या दिवशी उद्घाटनाच्या पहिल्या सत्रात बोलताना भंडारे म्हणाले, की मुलांच्या मनावर चांगले विचार रुजवण्याची आज नितांत गरज आहे. मात्र, पालक मुलाला घोड्याप्रमाणे पळवत असल्यामुळे त्याच्यावर विचार रुजवण्याची तसदी घेत नाही. त्यामुळे मुलांच्या मनावर विशेषतः त्यांच्या विचारांवर ठराविक जाती-धर्माचा पगडा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे प्रकार काही नवीन नाहीत. महात्मा गांधींच्या काळातही असे प्रकार होत होते. म्हणूनच त्यांनी जाती व्यवस्थेच्या विरोधात काम केले. त्यामुळे ते विचार आज तरुणांच्या मनात रुजवण्याची गरज आहे. तरुणच देशाचे नेतृत्व करू शकतात. प्रगत समाज निर्माण करायचा असेल तर तरुणांशिवाय पर्याय नाही आणि त्यांच्यावर गांधींचे विचार बिंबवल्याशिवाय प्रगत समाज निर्माण होणार नाही, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - कॅन्सर प्रबोधन यात्रेचे जालन्यात स्वागत
दुसऱ्या सत्रात राष्ट्रीय किसान संयोजन समितीचे संयोजक विवेकानंद माथने यांनीही आपले गांधी अध्ययन केंद्र आणि आजच्या संदर्भात गांधी विचार आणि युवा याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर यशवंत सोनुने यांनी केले, तर महावीर सदावर्ते यांनी सूत्रसंचालन केले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES