• A
  • A
  • A
जालन्यात पार पडणार काँग्रेसचे 'संवाद कार्यकर्ता शिबिर'

जालना - काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरात आठ फेब्रुवारीला संवाद कार्यकर्ता शिबिर पार पडणार आहे. येथील गुरु गणेश भवन सभागृहामध्ये सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली.


कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती देताना देशमुख म्हणाले, की सकाळी ९ वाजता सेवा दलाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम आणि दिवसभर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्य प्रभारी संपतकुमार, माजी आमदार नरहरी रुपनवर, परभणीचे माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, यांच्यासह ४ प्रशिक्षक पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा - राष्ट्रवादी म्हणजे घरफोडी सहकारी संस्था; सुरेश धस यांचा अजित पवारांना टोला
जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी जि. प. सदस्य प. स. सदस्य, न. प. सदस्य सेवादलाचे पदाधिकारी आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांना या शिबिरासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. सुमारे ८०० ते १००० पदाधिकारी या शिबिराला उपस्थित राहण्याची शक्यता देशमुख यांनी वर्तवली. यावेळी जालना काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश कुमार जेथलिया यांना परतूर विधानसभेची, तर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना जालन्यातून विधानसभेची उमेदवारी उमेदवारी जाहीर केल्याचे सांगितले.

हेही वाचा - काँग्रेसच्या अभद्र आघाडीमुळे मी पक्ष सोडला - रवींद्र पाटील
जालना लोकसभेसाठी उमेदवारांची नावे काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे पाठविली आहेत. श्रेष्ठी ठरवतील व सांगतील तोच पक्षाचा उमेदवार असणार आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्यासाठी आम्ही उत्सूक असून त्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे आम्ही आमची मते मांडल्याची माहिती माहिती कैलास गोरंट्याल यांनी दिली. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष शेख महेमुद, राजेंद्र राख यांची उपस्थिती होती.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES