• A
  • A
  • A
कॅन्सर प्रबोधन यात्रेचे जालन्यात स्वागत

जालना - आपल्यामुळे इतरांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणे हे नोबेल पुरस्कार मिळवण्यापेक्षा मोठे असते, असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अविनाश सावजी यांनी केले. अहमदनगर येथून सुरू झालेल्या कॅन्सर प्रबोधन यात्रेचे जिल्ह्यात स्वागत करताना त्यांनी हे मत व्यक्त केले.


प्रयास संस्था अमरावतीच्या डॉक्टर अविनाश सावजी यांनी कॅन्सर दिनानिमित्त सोमवारपासुन अहमदनगर येथून सुरू केलेली कॅन्सर प्रबोधन यात्रा मंगळवारी जालन्यात आली. दीपक रुग्णालय येथे वैद्यकीय विद्यार्थ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री डॉक्टर शंकरराव राख, दीपक रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉक्टर संजय राख, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अनुराधा राख, मच्छोदरी संस्थेचे प्राचार्य डॉक्टर बी आर गायकवाड, डॉक्टर बिपिन ताठे, डॉक्टर परीक्षित ठाकूर, प्रदीप काकडे शेख अख्तर आदींची उपस्थिती होती.


हेही वाचा - जालन्यात विश्वासू मुनीमाचा सोने-चांदी चोरीला गेल्याचा बनाव, मुनीम अटकेत
आपल्यामुळे इतरांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणारा आणि तो चिरकाल टिकणारा आनंदच आपल्या जीवनात खरा आनंद निर्माण करतो. त्यासाठी कुठल्याही पदवीचे, समाजात नाव, असण्याची आणि अन्य कोणत्याही बाबीची गरज नाही. असे केल्यानंतर रात्री झोपताना स्वतःच्याच पाठीवर थाप मारून घेऊन चांगले काम केल्याचा आनंद हा नोबेल पुरस्कारापेक्षाही मोठा आहे. नोबेल पुरस्कार तरी एकदाच मिळतो मात्र, हा आनंद आपण रोज मिळवू शकतो, त्यामुळे इतरांच्या दुःखात सहभागी होऊन त्यावर मात करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


हेही वाचा - बाळासाहेब ठाकरेंनी घालून दिलेला वारसा पुढे नेत आहे - आदित्य ठाकरे
पुढे बोलताना डॉक्टर सावजी म्हणाले, आपण इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि नजर बदलली पाहिजे. एखाद्याला कॅन्सर झाला तर आपला त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. मात्र, खऱ्या अर्थाने तोच आपला मार्गदर्शक असतो. कारण त्याने ते दुःख अनुभवलेले असते म्हणून तो इतरांना अशा व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचा सल्ला देतो. मात्र, आपण त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून त्यालाच बाजूला ठेवतो. यावेळी कॅन्सर झालेल्या अहमदनगर येथील शेख अख्तर आणि औरंगाबादच्या श्रीमती पोळ यांनीही स्वतःचे अनुभव कथन केले. त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. डॉक्टर बी. आर. गायकवाड यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES