• A
  • A
  • A
पोलीस अधीक्षक कार्यालयातील लाचखोर लिपिक अटकेत

जालना - जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील परिवार कल्याण विभागाचा लिपिक नागसेन ज्ञानोबा पवार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. पोलीस कल्याण निधी संबधीत काम करुन देण्यासाठी पोलिसालाच लाच मागणाऱ्या लिपीकावर ही कारवाई करण्यात आली.


तक्रारदार पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्या आईच्या शस्त्रक्रियेसाठी पोलीस कल्याण निधी शाखेमध्ये मदतीचा अर्ज केला होता. हा अर्ज वरिष्ठांसमोर ठेवून मंजूर करून घेण्यासाठी पवार यांनी तक्रार दाराकडे ३००० रुपये लाच मागितली होती. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर लाच मागितल्याची खात्री करून मंगळवारी सायंकाळी ५ वाजता ३ हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद चव्हाण, संतोष तायडे, प्रदीप दौंडे, संजय उदगीरकर, रमेश चव्हाण, गंभीर पाटील, प्रवीण खंदारे, आदींनी ही कामगिरी केली.

वाचा-उस्मानाबाद जिल्हा बँकेने सुरू केले महाराष्ट्रातील पहिले फिरते एटीएम

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES