• A
  • A
  • A
जालन्यात विश्वासू मुनीमाचा सोने-चांदी चोरीला गेल्याचा बनाव, मुनीम अटकेत

जालना- जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात एका विश्वासू मुनीमनेच सोने चांदीचा माल चोरीला गेल्याचा बनाव करत तो हडपण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. पुंजआप्पा असे त्या मुनीमचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


हेही वाचा- घरफोडी प्रकरणातील सराईत गुन्हेगार जेरबंद; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत
परभणी जिल्ह्यात जिंतूर येथे शशिकांत शिवराज आप्पा बेंडके यांचे सोन्या चांदीचे दुकान आहे. पुंजआप्पा त्यांच्याच दुकानात मुनीम म्हणून काम करतात. शशिकांत यांनी पुंजआप्पांना जालन्यातील सोन्या चांदीचे व्यापारी रिद्धी बुलियन यांच्याकडून १०० ग्रॅम सोने आणि २ किलो ७०० ग्रॅम चांदी ,असे ४ लाख ६१ हजार रुपयांचा माल घेऊन येण्यास सांगितले होते. पुंजआप्पांनी सदर व्यापाऱयाकडून तो माल खरेदीही केला आणि शशिकांत यांना परत निघत असल्याचा फोनही केला. त्यानंतर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पुंजआप्पांनी शशिकांत यांना परत फोन केला आणि बस स्टँडवर जाताना रिक्षातील सहप्रवाशांनी सोन्या चांदीची बॅग चोरून नेल्याचे सांगितले. या घटनेबाबत शशिकांत यांनी पुंजआप्पांना वारंवार विचारले. मात्र, त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर शशिकांत यांनी याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

हेही वाचा- अर्धापुरातील बेपत्ता व्यक्तीचा १० दिवसांनी गोदातिरी आढळला मृतदेह; खुनाचा गुन्हा दाखल
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गौर यांनी मिळालेल्या माहितीनूसार तपासाची चक्रे फिरवली आणि पुंजआप्पांना ताब्यात घेत विचारपूस केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच पुंजआप्पांनी आपला गुन्हा कबूल केला. तसेच माल ओळखीच्या एका महिलेकडे लपवून ठेवला असल्याचेदेखील सांगितले. पोलिसांनी त्या महिलेकडून तो माल ताब्यात घेत पुंजआप्पांना अटक केली आहे.

हेही वाचा- एसबीआयच्या बँक कर्मचाऱ्याची ग्राहकाशी उद्धट वागणूक; तक्रार दाखल-CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES