• A
  • A
  • A
दुष्काळाच्या झळा; गोशाळेतील २ गाईंचा चाऱ्याअभावी मृत्यू

जालना - तालुक्यातील एका गोशाळेतील २ गाईंचा चाराअभावी उपासमारीने मृत्यू झाला आहे. यासंदर्भात चाऱ्यासाठी गोशाळा चालकांनी उपोषण करूनही शासनाने त्यांच्या तोंडला पाने पुसली. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.


हेही वाचा-खऱ्या अर्थाने 'जगण्याची कला' शिकलेले एदलापूर गाव
जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होऊन २ महिने उलटून गेले. जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था न झाल्याने सामान्य शेतकऱ्यांसह गोशाळा चालकांनाही दुष्काळाच्या झळा सहन करावे लागत आहेत. दरम्यान, त्याची भीषणता एवढी तीव्र वाढली आहे की यामुळे रविवार तालुक्यातील एका गोशाळेतील २ गाईंचा चाराअभावी मृत्यू झाला.

यासंदर्भात जिल्ह्यातील गोशाळा चालकांनी २ महिन्यांपूर्वी हरी कार्यालयावर मोर्चा काढून जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. तरीदेखील शासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतरही २३ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोशाळेला चारा मिळावा, या मागणीसाठी ७ दिवस उपोषण करूनही शासनाने त्याच्या तोंडाला पाने पुसली. एवढा प्रकार घडल्यानंतरही शासनाने चाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे २ गोशाळा चालकाला मात्र आज हंबरडा फुटला.
हेही वाचा-बाळासाहेब ठाकरेंनी घालून दिलेला वारसा पुढे नेत आहे - आदित्य ठाकरे
जालना तालुक्यातील बाजिउम्रद येथे श्री संत सेवालाल महाराज या नावाने गोशाळा सुरू आहे. जालना आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या माळरानावर ही गोशाळा आहे. पावसाने दगा दिल्यामुळे गोशाळेभोवती असलेल्या शेतीमध्ये आणि गायरानामध्ये कापसाची पलटीदेखील शिल्लक राहिले नाही. अशा परिस्थितीत २६० गाईंना सांभाळण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. चाऱ्याअभावी सांभाळण्याची ऐपत नसणे, दूध देणे बंद होणे, नवसाला सोडलेल्या काही अशा विविध प्रकारच्या गाईंचा यामध्ये समावेश आहे. २००६ पासून ही गोशाळा सुरू आहे. परंतु अद्यापपर्यंत कोणताही अनुदान या शाळेला नाही. असे असतानाही केवळ परिसरातील चारा आणि या कुटुंबाचा गोधनावर असलेला विश्वास या जोरावर जनावरे जगवली.

मात्र, यावर्षी निसर्गाने अवकृपा केल्यामुळे या परिवारावर हे गोधन सांभाळायचे कसे? असा यक्षप्रश्न समोर आहे. त्यामुळे शासन दरबारी खेटे मारूनही पदरी निराशाच पडली. गोशाळेत असलेल्या गाई मरणासन्न अवस्थेत असून शरीरातील सर्व हाडे उघडी पडले आहेत. परिसरात चारा नसल्यामुळे केवळ पाण्यावर या गाईंना दिवस काढावा लागत आहे.
दरम्यान, काल दगावलेल्या २ गाई या शासनाच्या दुर्लक्षामुळे दगावली असून जिल्ह्याचे मुख्य अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना पशुवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच दुष्काळाची तीव्रता शासनाच्या डोळ्यात आणण्यासाठी या जनावरातील प्रतिकात्मक जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जाणार असल्याचेही शेतकरी संघटनेचे पदाधिकारी दत्ता कदम यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा-कार्यकर्त्यांचे मैदानात दंगे, नेत्यांचे व्यासपीठावर हितगुज
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES