• A
  • A
  • A
बाळासाहेब ठाकरेंनी घालून दिलेला वारसा पुढे नेत आहे - आदित्य ठाकरे

जालना - दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला घालून दिलेला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा वारसा आपण पुढे नेत आहोत. राजकारणाच्या माध्यमातूनदेखील रुग्णवाहिका यांसारखे उपक्रम राबवत असल्यामुळे आनंद वाटत आहे, असे वक्तव्य सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज जालना येथे केले.


हेही वाचा-कार्यकर्त्यांचे मैदानात दंगे, नेत्यांचे व्यासपीठावर हितगुज
१०० खाटांच्या रुग्णालयाचे लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आंबेकर, एजे बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सविता किंवनडे यांची उपस्थिती होती.
यावेळी ठाकरे यांनी राजकारणावर बोलणे टाळले. तसेच या रुग्णालयातील १०० खाटांची संख्या वाढवून ३०० ते ५०० पर्यंत करण्यासाठी आणि रिक्त असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या पूर्ण करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, असे सांगून १०८ नंबर डायल केल्यानंतर येणारी रुग्णवाहिका ग्रामीण भागातील घरापर्यंत कशी पोहोचवता येईल, यावर विचारविनिमय केला जाईल, असेही ते म्हणाले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले, या देशाच्या एका महिला पंतप्रधानाने सत्तेचा ११ वर्षे उपभोग घेतला. मात्र, महिलांसाठी काहीच केले नाही, याउलट सध्या एक पुरुष पंतप्रधान असतानाही महिलांसाठी उज्वला गॅससारखी योजना आणून त्यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच शासनाच्या महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहितीही दानवे यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी करून शिवसेनेने राबविलेल्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली.
हेही वाचा-शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड द्या- हरिभाऊ बागडेCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES