• A
  • A
  • A
कार्यकर्त्यांचे मैदानात दंगे, नेत्यांचे व्यासपीठावर हितगुज

जालना - गेल्या वर्षभरापासून जालना जिल्ह्यात लोकसभेच्या जागेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात उडत असलेले खटके जनतेला नवीन नाहीत. यांच्यासाठी कार्यकर्ते देखील मैदानात दोन हात करत आहेत. परंतु, हेच नेते जेव्हा एकाच व्यासपीठावर येऊन हितगुज करतात. तेव्हा आपण कोणासाठी? असा प्रश्न शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.


हेही वाचा-लोखंड वितळविण्याच्या भट्टीत स्फोट; १२ कामगार जखमी
महाराष्ट्र केसरी, भीम फेस्टिवल, पशुधन महा एक्सपो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून खोतकर यांनी शक्तिप्रदर्शन करून दाखविले. नंतर खासदार दानवे यांनी देखील भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेऊन आपली ताकद दाखवली. याच दरम्यान भोकरदन तालुक्यातील पारध ते धामणगाव रस्त्याचे काम करून दाखवावे, असे आव्हान खासदार दानवे यांनी खोतकर यांना दिले आणि ते आव्हान स्वीकारून खोतकर यांनी या रस्त्याचे उद्घाटन केले. त्यामुळे या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना आता पुढे काय? असा प्रश्न पडला आणि नंतर श्रेयांवरुन हे दोन्ही गट समोर भिडले. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीने हा तणाव तात्पुरता निवळला आहे.
या प्रकाराला ८ दिवस होत नाहीत तोच आज रविवारी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते येथील जिल्हा स्त्री रुग्णालयच्या नवीन वास्तूचे लोकार्पण झाले. यावेळी खासदार दानवे यांना हस्तांदोलन करून खोतकर यांना व्यासपीठावर घेतले. त्यानंतर व्यासपीठावर हितगुजही सुरू झाले. परवाच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'कुणीबी येतोय अन खासदार व्हायचं म्हणतंय' असा टोला खासदार दानवे यांनी खोतकर यांना लगावला होता. त्यामुळे आजच्या या जाहीर हितगुजपणामुळे आपण लढायचे कोणासाठी असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
हेही वाचा-गायीची उंची फक्त 'अडीच फूट', किंमत फक्त '९ लाख'CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES