• A
  • A
  • A
लोखंड वितळविण्याच्या भट्टीत स्फोट; १२ कामगार जखमी

जालना - भाग्यलक्ष्मी स्टील ही जालन्यातील औद्योगीक वसाहतीतील एक कंपनी आहे. यामध्ये लोखंड वितळवताना शनिवारी स्फोट झाला. यात १२ कामगार जखमी झाले आहेत. या कामगारांना कुठलीही सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली नव्हती, असे चौकशीअंती दिसून आले. कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या कंपनीतील भट्टी क्रमांक 'डी'वर १५ ते २० कामगार काम करत होते. लोखंडी भंगारचे पाणी करण्यासाठी त्यांनी मॅग्नेट भट्टीमध्ये टाकले होते. त्यावेळी अचानक भट्टीतील गरम पाणी उडाले. हे पाणी जवळ काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर उडाल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. रिजवान शेख (वय २५), राधेश्याम हिवाळे (वय २८), सुबोध यादव (वय ३०), देवेंद्र जाधव (वय ३२), शेखर शहाजी (वय २५), यादव शर्मा (वय २५), मोहम्मद जाफर (वय २५), राजेंद्र खोमणे (वय ३०) अशी जखमी कामगारांची नावे आहेत.
घटनेनंतर कामगारांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचारानंतर त्यातील १० जणांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले. भट्टीत काम करणाऱ्या कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा पुरवली गेली नव्हती, असे चौकशी केल्यानंतर दिसून आले. यामुळे कंपनीचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. सूर्यकांत कदम यांनी देल्या फिर्यादीवरुन चंदनझीरा पोलीस ठाण्यात कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मारुती घोडे करत आहेत.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES