• A
  • A
  • A
शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड द्या- हरिभाऊ बागडे

जालना - शेतकऱ्यांनी फक्त शेतीवरच अवलंबून न राहता त्याला दुग्धव्यवसायाची जोड द्यावी आणि आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले आहे. ते जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या महा पशुधन एक्सपो - २०१९ च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.


यावेळी व्यासपीठावर महादेव जानकर, अर्जुन खोतकर, एकनाथ शिंदे, आमदार राजेश टोपे, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवयानी डोणगावकर, ह. भ. प. गोंदीकर महाराज, जिल्हाधिकारी रवींद्रबिनवडे, पोलीस अधीक्षक चैतन्य एस. आदी उपस्थित होते.
बागडे म्हणाले, महाराष्ट्रात असलेल्या गीर प्रकारातील गाईंची दूध देण्याची क्षमता चांगली होती, मात्र आपण त्यांच्या चारा पाण्याकडे दुर्लक्ष केले, यामुळे या गाईंवर इस्त्रायलने संशोधन करून 35 लिटर दूध देण्याची त्यांची क्षमता असल्याचे दाखवून दिले आणि आपण हातावर हात धरून बसलो, त्यामुळे या प्रदर्शनाच्या माध्यमातून आणि चर्चासत्रातून जोडधंद्याविषयी माहिती घ्यावी आणि पशुधन जोपासून आपली आर्थिक उन्नती करून घ्यावी, असेही ते म्हणाले.

वाचा -
विमानातील प्रवाशाच्या बॅगेत सापडला बिबट्याचा बछडा, तस्कर पोलिसांच्या ताब्यात
याचवेळी महादेव जानकर आणि एकनाथ शिंदे यांनीही आपली मते मांडली. सकाळी 11 वाजता होणारे उद्घाटन दुपारी दोन वाजता झाल्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या शेतकऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. या कार्यक्रमात काही महिला बचत गटांनाही प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार होते. त्यामुळे खेड्यातून आलेल्या या महिलांना ताटकळत बसावे लागले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES