• A
  • A
  • A
गायीची उंची फक्त 'अडीच फूट', किंमत फक्त '९ लाख'

जालना - जालन्यात सुरू असलेल्या 'हाय एक्सपो'मध्ये ९ लाख रुपये किंमत असलेल्या आणि अडीच फूट उंचीच्या गाईला पाहण्यासाठी सध्या नागरिकांमध्ये झुंबड उडाली आहे. ऐरव्ही पाहायला मिळत नसलेल्या गाईंच्या प्रजातीमधील 'पुंगनूर' या तामिळनाडू भागातील चित्तूर मूळस्थान असलेल्या गाईला पाहण्यासाठी मराठवाड्यासह इतर ठिकाणच्या पशुप्रेमींनी गर्दी केली होती.


हेही वाचा-पाऊसच नाही तर पेरणीचा काय उपयोग? असाच हा अर्थसंकल्प - प्रकाश आंबेडकर
भारतामधील सर्वात कमी उंचीची आणि देशी वंशाची ही गाय आहे. सुमारे अडीच फूट उंच असणाऱ्या या गाईचे आयुष्य १५ ते १६ वर्षे आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा पद्धतीची बुटकी दिसणारी लांबी लाकूड असणारी गाई १ ते २ लिटर दूध देते. मात्र, या दुधाची किंमत आपल्या रोजच्या वापरातील दुधापेक्षा १० ते १५ पटीने जास्त आहे.

म्हणजेच सुमारे हजार रुपये लिटर पर्यंत हे दूध विकले जाते. याचे कारण म्हणजे या दुधामध्ये असलेले औषधी गुणधर्म आहेत. कोल्हापूर येथील शेतकरी बाजीराव यांची ४ वर्षांची गाय मागील ३ वर्षापासून सर्वांचे आकर्षण ठरत आहे.

हेही वाचा-काँग्रेस - भाजपचे साटेलोटे, लेखी आश्वासनांशिवाय काँग्रेसवर विश्वास नाही - अॅड. आंबेडकर

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES