• A
  • A
  • A
हिंगोली जिल्ह्यातील एकलव्य मूर्तिकाराच्या नशिबी फक्त उपेक्षाच

हिंगोली - जिल्ह्यातील पोत्रा येथे एक एकलव्य मूर्तीकार आहे. या मूर्तिकाराला जिल्ह्यातच नव्हे तर आजुबाजूच्या परिसरातही मूर्ती साकारण्यासाठी मागणी आहे. त्याच्या कलेचा वापर होत असला तरी त्या मूर्तिकाराचा जिल्ह्यात साधा सन्मान देखील होत नाही. या मूर्तीकाराने कोणतेही प्रशिक्षण घेतले नसले तरीही एकदा पाहिलेला चेहरा त्याला पूर्णपणे आठवणीत राहतो. तसेच फोटो वरूनही हुबेहूब आकर्षक मूर्ती सिमेंट आणि रेतीतून हा साकारतो. तीही अगदी थोड्याच वेळात. अशा या मूर्तीकाराचा हा विशेष रिपोर्ट....

जगन्नाथ गायकवाड, मूर्तीकार


जगन्नाथ गायकवाड, असे या मूर्तिकाराचे नाव आहे. गायकवाड यांचे मूळगाव हिंगोली जिल्ह्यातील आजरसोंडा हे आहे. मात्र, जगन्नाथ यांचे वडील सोमभारती हे लहानपणीच भिक्षा मागत-मागत पोत्रा या गावी पोहोचले अन् तेथेच स्थायिक झाले. कालांतराने सोमभारती यांचे निधन झाले. नंतर घरची सर्वच जबाबदारी घरात मोठे आलेल्या जगन्नाथ यांच्यावर येऊन ठेपली. त्यांना अंबादास नावाचा लहान भाऊ असल्याने त्याच्या शिक्षणाची देखील जबाबदारी जगनाथ यांनाच पेलावी लागत असे. घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्याने मिळेल ते काम करून जगन्नाथ हे घर चालवत होते. त्यांना शिक्षणाची गोडी असली तरीही घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता येत नव्हते. कसेबसे शिक्षण घेतले तर त्याला यशही मिळाले. त्याना कर्नल, पोलीस, तलाठी आणि रेल्वेमध्ये सेंटरचे काम करण्याची त्यांना नोकरी मिळाली होती. मात्र, वरिष्ठांच्या तगाद्यामुळे आणि त्यांना त्यांची कला जोपासण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने त्यांनी त्या नोकर्‍या सोडून दिल्या.
हेही वाचा - एक मूल ३० झाडे ! शिक्षकाचा उपक्रम अभिनेता सयाजी शिंदेंना भावला
संपूर्ण वेळ ते पेंटिंग करण्यातच घालवत होते. नांदेड जिल्ह्यात मंदिराच्या रंगरंगोटी आणि भिंतीवर देवी देवतांचे फोटो काढण्यासाठी गेले होते. मात्र, त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकार मिळत नव्हते, योगायोगाने गायकवाड यांना तेथील ग्रामस्थांनी आपल्याला गणपती मूर्ती बनविता येते का? असा प्रश्न केला. मात्र, कधीच मूर्ती न बनविलेल्या गायकवाड यांनी होकार दिला आणि मूर्ती बनविण्यास सुरुवातही केली. त्यांनी पहिलीच मूर्ती खूप आकर्षक साकारली. तेव्हापासून गायकवाड यांना मूर्ती बनविण्यात गोडी निर्माण झाली.
आज घडीला भोपाळ, आंध्र प्रदेश, देगलूर, तुळजापूर, नळदुर्ग आदी ठिकाणी वेगवेगळ्या परिसरातील गावांमध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे तर महादेव, गणपतीच्या आकर्षक मूर्ती बनविलेल्या आहेत. तसेच मंदिरावर वानर, वाघ जे काही डोळ्याने पाहू शकतो, त्याची या सिमेंट अन् रेतीच्या साह्याने मूर्ती बनविलेल्या आहेत. आत्मविश्वास आणि निसर्गच हा माझा गुरू असल्याचे गायकवाड सांगतात. मूर्ती बनविण्यातून मिळालेल्या मोबदल्यात ते घराचा गाडा चालवतात. याच कलेवर त्यांनी त्यांचा एक मुलगा सैन्यात दाखल केला आहे.

हेही वाचा - महाआरोग्य शिबिराला मंत्र्यांच्या दांड्या
हिंगोली जिल्ह्यात अतिशय मागास असलेल्या भागात हा एकलव्य मूर्तीकार पर जिल्ह्यात जाऊन आकर्षक मूर्ती घडवितो. मात्र, त्या मूर्तिकाराचा हिंगोली जिल्ह्यांमध्ये साधा सन्मानही झाला नाही. एवढेच नव्हे तर निजामाने त्यांच्या वडिलांना दिलेल्या घराचा नमुना नंबर आठही नसल्याने मूर्तिकार विविध शासकीय योजनेपासून वंचित आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलाला त्यांनी सैन्यांमध्ये दाखल केल्यामुळे घरची परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. त्यांचे वास्तव्य एका उंच टेकडीवर असल्याने चालताना जराही तोल गेल्यास व्यक्ती थेट माळाच्या बुडाशी जाऊन टेकतो. मात्र, एवढे वय वाढूनही हा मूर्तिकार हा माळ मोठ्या नेटाने चढतोय हे देखील एक धाडसच म्हणावे लागेल. निदान माझ्या कलेची कदर व्हावी आणि मला शासकीय योजनेचा एखादा तरी लाभ व्हावा, अशी अपेक्षा मूर्तिकार जगन्नाथ गायकवाड यांनी ईटीव्ही मराठीशी बोलताना व्यक्त केली.
जिल्ह्यात अजूनही असे कलाकार मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, ते आजही समाजाच्या प्रवाहापासून दुरावलेलेच आहेत. त्यामुळे शासन स्तरावर अशा कलाकारांच्या कलेची कीव करून निदान त्यांच्या पाठीवर एखादी कौतुकाची थाप तरी द्यावी, ही अपेक्षा.
हेही वाचा - हिंगोलीच्या आरोग्य शिबिरात रुग्णांची गर्दी


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES