• A
  • A
  • A
हिंगोलीच्या आरोग्य शिबिरात रुग्णांची गर्दी

हिंगोली - पहिल्यांदाच हिंगोलीत रेल्वे स्टेशन परिसरातील अटल मैदानावर आयोजित केलेल्या भव्य आरोग्य शिबीरात जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात रूग्ण तपासणीसाठी दाखल झाले आहेत. एका आजाराचे ३ ते ४ बाह्यरुग्ण कक्ष स्थापन केल्यामुळे रुग्णांची तपासणी अगदी कमी वेळेत होते. तसेच या ठिकाणी रुग्णांना मुबलक प्रमाणात औषधे दिली जात असल्याने रुग्णांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.हेही वाचा-एक मूल ३० झाडे ! शिक्षकाचा उपक्रम अभिनेता सयाजी शिंदेंना भावला
तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची चुकामुक होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, लाऊडस्पीकरवरून देण्यात येणाऱ्या सुचनांमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मदत होत आहे. या ठिकाणी दीड हजारांपेक्षा अधिक डॉक्टर उपस्थित असल्याने काही वेळातच तपासणी होत आहे. येथे ४ ते ५ फिरते शौचालयही ठेवण्यात आले आहेत. दंतविभागच्या मोबाईल व्हॅनही येथे उपलब्ध आहे. यावेळी रुग्णांची तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी तारखा दिल्या जात आहेत.
हेही वाचा-१० फेब्रुवारीला हिंगोलीत मोफत महाआरोग्य शिबीर, ५८ हजार रुग्णांनी केली नोंदणीCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES