• A
  • A
  • A
एक मूल ३० झाडे ! शिक्षकाचा उपक्रम अभिनेता सयाजी शिंदेंना भावला

हिंगोली - मागील तीन ते चार वर्षांपासून जिल्ह्यात अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने शेतकऱ्यांची पुरती दैना झाली आहे. मात्र, उपलब्ध आहे त्या पाण्याचे नियोजन करून मोठ्या कष्टाने पिकविलेल्या शेतीमालाला अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नसल्याने या मालाला भाव मिळवून देण्यासाठी एक शिक्षक दोन वर्षांपासून धडपड करीत आहे. यासोबतच आता जिल्ह्यात वृक्ष लागवडीची एक मूल ३० झाडे ही संकल्पना राबविण्यास सुरुवात त्यांनी केली.हेही वाचा - झाडे टिकली तरच आपण जगू, वृक्ष लागवड चळवळीत सहभागी व्हा - सयाजी शिंदे

विविध चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका निभवणाऱ्या अभिनेता सयाजीराव शिंदे यांना ही संकल्पना भावली. त्यांनी लगेचच हिंगोलीच्या शिक्षकाशी संपर्क साधला आणि त्यांना मुंबईत भेटायला बोलावले. अण्णासाहेब जगताप असे या शिक्षकाचे नाव असून ते हिंगोली जिल्ह्यातील जवळा येथील जय भारत विद्यालय या शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची नेहमीच निसर्गासमोर हतबल झालेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी धडपड असते. त्यांच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना लाभ होईल.


जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. ते वाढविण्यासाठी आता या शिक्षकाने एक मूल ३० झाडे ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. या संकल्पनेत एक मूल जन्मल्यास त्याच्या नावाने आपल्याच शेतात तीस झाडे लावायची आणि त्या मुलांनाच या झाडाचे संगोपन करायला सांगायचे. चिमुकल्याने पाणी घातलेले झाड त्याचे वडील अजिबात तोडण्याचा विचार करणार नाही, हाच याचा उद्देश आहे. ही माहिती सयाजी शिंदेंना कळताच त्यांनी झाडे आणि बिया उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली.

हेही वाचा - महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधींची यवतमाळात भेट, केले वृक्षारोपण...
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES