• A
  • A
  • A
१० फेब्रुवारीला हिंगोलीत मोफत महाआरोग्य शिबीर, ५८ हजार रुग्णांनी केली नोंदणी

हिंगोली - शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील अटल मैदानावर १० फेब्रुवारीला मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व जलसंपदा, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून हे शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबिरासाठी आत्तापर्यंत ५८ हजार ४७५ रुग्णाची नोंदणी झाली असून शिबिराच्या दिवशी १९२ प्रकारची औषधे घेऊन ५ ट्रक दाखल होणार आहेत.


वितरण विभागातून तपासणी केलेल्या रुग्णांना २४ प्रकारची औषधे मिळणार आहेत. या शिबिराची प्रशासन व नगरपालिकेच्यावतीने तयारी सुरू आहे. शिबिरात तपासणीसाठी १ लाखांपेक्षाही रुग्ण येण्याची शक्यता असल्याचे आमदार तानाजी मुटकुळे आणि जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.
शिबिराच्या नियोजनासाठी मंत्रालयातील वैद्यकीय विभागाचे विशेषाधिकारी संदीप जाधव यांच्यासह डॉक्टरांची टीम दाखल झालेली आहे. येथे १०० विभाग असून प्रत्येक विभागात ४ डॉक्टरांची टीम राहणार आहे. यामध्ये ५०० ते ६०० रुग्ण तपासणीस एकाच वेळी थांबू शकतील. आरोग्य शिबिरासाठी मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तर यवतमाळ, नांदेड अकोला येथील मेडिकल कॉलेजचा ७०० ते ८०० चा असा एकूण १ हजारांचा ५०० डॉक्टरांचा स्टाफ उपस्थित राहणार आहे. शिबिरात रक्तदाब, स्तन कर्करोग, लठ्ठपणा, जनरल मेडिसिन, अस्थीरोग, वृद्धविकार, मूत्ररोग, आयुष्य, दंत अशा सर्व आजारांची तपासणी शिबिरात होणार आहे. एवढेच नव्हे तर रुग्ण आणण्यापासून ते घरी नेण्यापर्यंत वाहनांची व्यवस्था केली आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES