• A
  • A
  • A
मुख्यमंत्री फडणवीसांच्या शेजारी उभे राहण्याच्या प्रयत्नात आमदार महोदय 'पडले'; व्हिडिओ व्हायरल

हिंगोली - शहरात झालेल्या शेतकरी मेळाव्याच्या मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशेजारी उभे राहण्याच्या प्रयत्नात असतानाच हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी मुटकुळे पाय घसरून पडल्याची घटना घडली आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सभेपेक्षा आमदार महोदयांच्या या 'अपघाताचीच' परिसरात चर्चा रंगली आहे.


मुख्यमंत्री फडणवीस हिंगोलीत शेतकरी आणि बचतगट मेळाव्यासाठी आलो होते. सभास्थानी मुख्यमंत्र्याचे आगमन होताच मुख्यमंत्री, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे आणि पालकमंत्री हे जनतेला हात वर करून हस्तांदोलन करत होते. मात्र मुख्यमंत्र्याच्या शेजारी जाऊन उभे राहण्यासाठी अत्यंत लगबगीने जाणारे आमदार तानाजी मुटकुळे पाय घसरून पडले. मुटकुळेंना पंकजा मुंडेंनी आधार देण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीच उपयोग झाला नाही. चक्क मुख्यमंत्री मंचावरून जनतेसमोरच आमदार खाली पडल्याची चर्चा चांगलीच रंगते आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES