• A
  • A
  • A
मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच धनगर समाजाने दाखविले पिवळे झेंडे

हिंगोली - भाजपतर्फे घेण्यात आलेल्या बचत गट आणि शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री भाषणाला उठताच धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घालत मुख्यमंत्र्यांना केवळ आरक्षणाच्या मुद्द्यावर बोला, असे म्हणत पिवळे झेंडे दाखविले. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. गर्दीच्या मधोमध असलेल्या आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली.


हिंगोली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर रामलीला मैदानावर भाजपतर्फे आयोजित मेळाव्यात हा प्रकार घडला. आंदोलकांना पोलीस ताब्यात घेणार तोच मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की दिसणारे पिवळे झेंडे आमचेच आहेत, त्यांना काय बोलायचं ते माझ्या लक्षात आहे, नंतर बोलतो. तरीही पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सभेत झालेल्या घोषणाबाजीने जवळपास १० मिनिटे गोंधळ सुरू होता.
हेही वाचा- राष्ट्रवादी म्हणजे घरफोडी सहकारी संस्था; सुरेश धस यांचा अजित पवारांना टोला
या मेळाव्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, पालकमंत्री दिलीप कांबळे, आ. तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, आदींची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, हिंगोली जिल्ह्याचा सर्वाधिक विकास करायचा आहे. आमदार मुटकुळे यांनी शहराच्या भूमिगत गटार योजनेसाठी मागीतलेला ८० कोटींचा निधी लगेचच देऊ केला. त्यातून कामेही झाली. मात्र, भूमिगत गटाराचे काम करताना खोदलेले रस्ते त्रास दायक ठरत असल्याने आमदार मुटकुळे यांनी १०० कोटींची मागणी केली. तो निधी देखील प्रस्ताव मंजूर करून तीन टप्यात देण्यात येईल.

हेही वाचा-लोकसभा जिंकण्यासाठी काँग्रेसची सत्यनारायण पूजा?
त्याचबरोबर २०२०-२१ मध्ये एकही कुटुंब बेघर राहणार नसून ५ लाख घर दिले जाणार आहेत. अजूनही घरकुलांचे प्रस्ताव पठवून देण्याचे आवाहन आमदार मुटकुळे आणि नगराध्यक्ष बांगर यांना केले. सरकार आपल्याला काहीही कमी पडू देणार नाही. त्यामुळे तुमचा आशीर्वाद म्हणजे आमची शिदोरी असून तो सरकारच्या पाठीशी राहू द्या, असेही मुख्यमंत्री फडवणीस यांनी सांगितले. यानिमित्ताने शहरातुन वाहतूक वळविण्यात आल्याने वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES