• A
  • A
  • A
पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम; माजी आमदारासह शिल्पकाराला निमंत्रण, पण पासेस नाहीत

हिंगोली - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, यादीत नाव असणाऱ्यांनाच पोलीस प्रशासन पुतळ्याच्या आवारात सोडत आहे. मुख्य म्हणजे ज्यांनी हा पुतळा बनविला त्यांचेच नाव यादीत नसल्याने त्यांच्या पाससेचे जुगाड करून आत सोडण्यात आले. तर जनता दलाचे माजी आमदार दगडू गलांडे यांचे देखील नाव यादीत नसल्याने त्यांनादेखील बाहेरच थांबावे लागले. अनेक पदाधिकारी देखील पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घालत होते.


एकंदरीत ज्यांचे नाव यादीत आहे, त्यांनाच पोलीस आता प्रवेश देत होते. मात्र, एवढेच नव्हे तर शिवसेनेचे संपर्क प्रमुख यांना देखील बाहेरच ताटकळत ठेवले होते. त्यांच्यासाठी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत वाद घातला, तरीही सोडले नाही. शेवटी मुख्यधिकारी रामदास पाटील प्रवेश द्वारावर आले. त्यांनी त्या संपर्क प्रमुखाला सोबत नेले. मुख्य म्हणजे ज्या संताजी चौगुले यांनी दिवस रात्र एक करून राजांचा पुतळा बनविला, त्यांचेच नाव पासेस यादीत नव्हते. त्यांच्या पासेसचे जुगाड करून त्यांना आत सोडण्यात आले. त्यांच्यासोबत अलेल्या ३ सहकाऱ्यांना बाहेरच थांबविण्यात आले होते.
पोलीस प्रशासन जराही कोणाचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे आतून पदाधिकारी प्रवेश द्वारावर आलेल्या सहकाऱ्याला घेण्यासाठी येत होते. कोणाला सोडले, कोणाला नाही. हा रंजक खेळ मात्र अनेक जण पाहून खिल्ली उडवीत होते. तर बरेच जण पोलीस अधीक्षक यांच्याशी फोनवरून संपर्क करत होते.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES