शिवाजी महाराजांचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या फोटोपेक्षा लहान छापल्याने शिवप्रेमी नाराज
हिंगोली - शहरात प्रदीर्घ प्रयत्नानंतर बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते थाटामाटात अनावरण होणार आहे. या अनावरणासाठी भाजपच्या वतीने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकावर मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो मुख्यमंत्र्याच्या फोटोखाली आणि तोही लहान आकारात छापल्याने, आजच्या या प्रसिद्धी पत्रकाची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगत आहे.
हिंगोली येथे शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यासाठी मागील १५ वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. ते या वर्षात पूर्णत्वास गेले आहे. भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हिंगोली येथे उभारण्यात आला आहे. त्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते होणार आहे. एक ते दीड महिन्यापूर्वी आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी मुख्यमंत्री फडवणीस यांना पुतळ्याच्या अनावरणासाठी निमंत्रण दिले होते. त्यांनी ते लगेच स्वीकारलेही. त्यामुळे पुतळ्याच्या अनावरणाच्या तयारीला गती अली होती. तो क्षण अगदी जवळ येऊन ठेपला आहे. मात्र, ज्या क्षणाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती त्यासाठी काढण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकाने मात्र हिंगोलीकरांचे खरोखर डोळेच फिरले. हेही वाचा -छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरणाच्या दिवशी सरपंच संघटनेचे धरणे ज्यांच्या पुतळ्याचे अनावरण आहे त्या शिवाजी महाराजांचा फोटो हा मान्यवरांच्या खाली छापण्यात आला आहे. शिवाजी महाराजांच्यावर मुख्यमंत्र्याच्या फोटो आणि बाजूला जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा फोटो, तर शिवाजी महाराज यांच्या खाली आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांचे फोटो असल्याने शिवाजी महाराज यांच्यापेक्षा मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या फोटोला सर्वाधिक महत्व दिल्याच्या भावना शिवप्रेमी व्यक्त करीत आहेत. हेही वाचा -औंढा नागनाथ संस्थानच्या स्वागत कक्षास सील; सहायक धर्मदाय आयुक्ताचे व्यवस्थापकास आदेश आज दिमाखदार होणाऱ्या सोहळ्यासाठी काढण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात शिवाजी महाराज एक सामान्य राजा असल्याचे दिसून येत आहे. जिथे तिथे या प्रसिद्धी पत्रकाचीच चर्चा जोरात रंगत आहे. तसेच मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत भव्य महिला बचतगट मेळावा आणि शेतकरी मेळावाही होणार असल्याने, जिल्हाभरातून मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते येणार आहेत. मुख्यमंत्री येणार असलेल्या मार्गाची सफाई करण्याचे काम पालिकेच्या वतीने अनावरणाची तारीख निश्चित झाली तेव्हापासून हाती घेतले आहे. धुळीने माखलेले रस्ते तर चक्क पाण्याने धुवून काढण्यात आले आहे. त्यामुळे निदान अनावरणाच्या निमित्ताने काही वेळ तरी या मार्गावरून ये जा करणाऱ्यांची धुळीपासून सुटका होण्यास मदत होणार आहे.