• A
  • A
  • A
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरणाच्या दिवशी सरपंच संघटनेचे धरणे

हिंगोली - मुख्यमंत्री आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होणार आहे. मात्र, पुतळा अनावरणाच्या दिवशीच दलित वस्तीच्या निधीसाठी सरपंच संघटनेच्यावतीने याठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.


हेही वाचा - महापौरांच्या वार्डातील नागरिकांचा महापौर कक्षात ठिय्या
जिल्ह्याला सन २०१६-१७ मध्ये दलित वस्ती सुधार योजनेतून प्राप्त झालेल्या २६ कोटी रुपयांचा निधीतून दलित वस्तीत पुन्हा कामे होत असल्याचे कारण समोर करुन आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी स्थगिती आणली. चौकशी झाली मात्र, यात काहीही उघड झालेले नसले तरीही स्थगिती काढून घेतली नाही. संघटनेच्यावतीने अनेकदा आमदार मुटकुळे यांची भेट घेऊन, दलित निधी खर्च करू देण्यासाठी मार्ग मोकळा करण्याची मागणी केली मात्र, काहीही उपयोग झाला नसल्याने सरपंच संघटना शिवाजी महाराज पुतळ्या समोर धरणे करणार आहे, अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली.

आमदार तानाजी मुटकुळे यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात दलित वस्तीच्या निधीचा मार्ग मोकळा करुन देण्याचे आश्वासन सरपंचांना दिले होते. मात्र अजूनही दलित वस्तीचा निधी खर्च करण्यासाठी कोणत्याही हालचाली झालेल्या नसल्यामुळे सरपंच संघटना आक्रमक झाली आहे. एवढेच नव्हे तर सदरील निधी हा मागासवर्गीय लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेली तरतूद आहे. मात्र, प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी त्याचबरोबर लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक या निधीतून कामे मार्गी लावण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप संघटनेच्यावतीने केला आहे.

हेही वाचा - शताब्दी साजरी केलेल्या शाळेला कुलूप ठोकून पालकांचे 'शाळा बंद' आंदोलन
संघटनेने आंदोलन करू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच आमदारही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी निरोप पाठवत आहेत. मात्र, अजूनही कोणताच तोडगा निघाला नसल्याने सरपंच संघटना सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज परिसरात बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत. यावेळी ही संघटना मुख्यमंत्र्यांना दलित वस्तीचा निधी खर्च करण्यासाठी मार्ग मोकळा करुन देण्याची मागणी करणार आहेत. आता मुख्यमंत्री सरपंच संघटनेला काय आश्वासन देतात याकडे जिल्ह्यातील सरपंचांचे लक्ष लागले आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES