• A
  • A
  • A
श्रीमंताला श्रीमंत अन् गरिबांना गरिब करणे हेच सरकारचे धोरण - प्रकाश आंबेडकर

हिंगोली - सरकारचे धोरण केवळ श्रीमंताला श्रीमंत करणे आणि गरिबाला गरीबच करणे हेच आहे. या सरकारने अर्थव्यवस्थेची पूर्णता वाट लावलेली आहे, असे मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. हिंगोली येथील दसरा मैदानावर भारिप बहुजन महासंघ व एमआयएम वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन मेळाव्यात प्रकाश आंबेडकर बोलत होते.


आंबेडकर म्हणाले, की घरात सर्व वस्तू खरेदी केल्यानंतर पुन्हा त्याच वस्तू कशा खरेदी करता येतील हेच या अर्थसंकल्पात सांगितले आहे. सध्याची सिस्टीम व्यवस्थित आहे, मात्र ही सिस्टम राबवणारी यंत्रणाच बरोबर नसल्याने महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्राची तिजोरी भरलेली आहे, परंतु तिला लुटारूंपासून वाचवणे गरजेचे आहे. देशामध्ये मंदीरात जमा होणाऱ्या दानातूनच देश कर्जातून मुक्त होऊ शकतो. ओबीसी, एसी समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास मदत होऊ शकतो. मात्र, ते या सरकारला अजिबात करायचे नाही. जनतेला खोटे आश्वासन देऊन ते सत्येत येण्याचा प्रयत्न करत आहे. सत्येत आल्यानंतर त्यांना संविधान बदलायचे आहे.
अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याची संधी ही केवळ संविधानामुळेच मिळाली आहे. हे करू न देण्यासाठी आपण वंचित बहुजन आघाडीला सहकार्य कराल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. एकदा जाहीर करण्यात आलेले उमेदवार हे कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाहीत, असेही आंबेडकरांनी सांगितले.

सध्या बँकामध्ये कर्ज दिले जात नाही. आपल्या हातात सत्ता आल्यानंतर आपलीच बँक तयार करून व्यवसायासाठी ९० ते ९५ टक्के कर्ज हे विनातारण उपलब्ध करून दिले जाईल, असेही आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES