• A
  • A
  • A
औंढा नागनाथ संस्थानच्या स्वागत कक्षास सील; सहायक धर्मदाय आयुक्ताचे व्यवस्थापकास आदेश

हिंगोली - तिर्थक्षेत्र औंढा नागनाथ संस्थानच्या स्वागत कक्षास सील लावण्याचे आदेश सहायक धर्मदाय आयुक्तांनी व्यवस्थापकाला दिले आहेत. केवळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, खासदार आणि आमदारांनाच कक्षात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे यांच्या व्यतिरिक्त येणाऱ्यांना मात्र स्वागत कक्षात प्रवेश घेण्यासाठी सहायक धर्मायुक्ताची परवानगी घ्यावी लागणार आहे.


हेही वाचा - अण्णा हजारेंची प्रकृती खालावली; यकृतावर परिणाम, ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा

संस्थान परिसरात असलेल्या स्वागत कक्षात अनोळखी व्यक्ती आणि असंबंधीत व्यक्तींचा वावर वाढल्याचे कारण देत आयुक्तांनी हा निर्णय घेतला. स्वागत कक्षास सील करण्यात आल्याने विश्वस्थांना देखील बाहेर बसून राहावे लागणार आहे. विशेष म्हणजे हे आदेश अध्यक्ष किंवा विश्वस्थ यांना न देता व्यवस्थापकाला दिल्याने संस्थानचे विश्वस्थ आणि कर्मचारी चांगलेच बुचकळ्यात पडले आहेत.

हेही वाचा - नाणार प्रकरणी सुकथनकर समिती रत्नागिरीत दाखल; पोलिसांचा चोख बंदोबस्त

दरवर्षी संस्थानच्या वतीने साजरा होणाऱ्या महाशिवरात्री उत्सव पुढील महिन्यात येऊन ठेपला आहे. त्यामुळे संस्थांच्या कारभारावर या आदेशाचा मोठा परिणाम होणार आहे. या उत्सवाचे संपूर्ण काम याच स्वागत कक्षातुन पाहिले जाते. आता मात्र विश्वस्त मंडळाला कामकाज उघड्यावर बसून पाहावे लागणार आहे. तसेच या कक्षामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, खासदार आणि आमदार यांचाच उल्लेख असल्याने जिल्हाधिकारी, स्थानिक न्यायाधीश, स्थानिक पदाधिकारी व विश्वस्त यांना देखील स्वागत कक्षात जाण्यासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. या तुघलकी आदेशामुळे सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत. या लिखित आदेशाची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे.
हेही वाचा - सातव्या दिवशीही आंदोलन सुरुच; अण्णा हजारेंची प्रकृती खालावली
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES