• A
  • A
  • A
हिंगोलीतील गरकीन काकडीला परदेशात मागणी; अपुऱ्या यंत्र सामुग्रीचा शेतकऱ्यांना फटका

हिंगोली - जिल्ह्यात गरकीन काकडीच्या पिकाचे लोण सर्वत्र पसरत आहे. या काकडीच्या उत्पादनातून शेतकऱयांना चांगला नफाही मिळत आहे. मात्र, या उद्योगावर प्रक्रिया करणारी यंत्र सामुग्री येथे कमी पडत असल्याने, मालावर प्रक्रिया करण्यासाठी हा माल बंगळुरूला पाठवला जात आहे. यामुळे सरकारने जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी उद्योगावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे मत येथील शेतकरी आणि बेरोजगार तरूण व्यक्त करत आहेत.


हेही वाचा - ३ लाखांपर्यंत कर्ज घेतल्यास शेतकऱ्यांना कोणताच शुल्क नाही; केंद्राचा...
जिल्ह्यात पहिल्यांदाच रब्बी पिकाला शेतकऱ्यांनी बगल देत गरकीन काकडीची लागवड केली आहे. ही काकडी आरोग्यासाठी गुणधारक आहे. तसेच तिला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या काकडीचे पीक अगदी कमी पाण्यावर येणारे असून, शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न देणारे आहे. त्यामुळे ही काकडी लावणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात शंभराच्यावर पोहोचली आहे. आज या घडीला जिल्ह्यातील खडकत, लिंबी, भिंगी, लोहारा, गाडी बोरी, चिंचपुरी, मोप, भिरडा, पारडा भागात या काकडीची लागवड करण्यात येत आहे. या काकडीमुळे शेतकऱ्यांनी रब्बी पिकाला बगल दिली आहे, ज्या शेतात ५ ते ६ महिन्यांत रब्बी पिकाचे उत्पन्न मिळत होते, ते काकडीच्या उत्पन्नातून केवळ १ ते दीड महिन्यातच निघत आहे. शिवाय शेतकऱ्यांना जाग्यावरच काकडी लागवडीसाठी बिया उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच काकडी घेऊन जाण्यापर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

काकडी खरेदी करताना त्याचे वर्गीकरण केले जात आहे. 'अ' मध्ये अगदी बारीक काकडी तिची खरेदी २७ किलो, 'ब' - थोडी मोठी १८ किलो, 'क'- ७ किलो आणि 'ड'- केवळ ३ रुपये किलो अशा दराने काकडी खरेदी केली जाते. मात्र, सर्वाधिक जास्त शेतकरी 'अ' दर्जाचीच काकडी विक्री करतात, जेणेकरून लवकरच तोडा येतो आणि काकडीचा वेल ही ओझं सांभाळू शकतो. या सर्व प्रकारामुळे मात्र शेतकऱ्यांमध्ये काकडी विक्रीची गोडी निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून काकडी गोळा केल्यानंतर तिच्यावर लिंबाळा मक्ता भागात प्राथमिक प्रक्रिया केली जाते. काकडीवर मीठ आणि पाणी एकत्र करून २१ दिवस २०० लिटरच्या टाकीत ठेवली जाते आणि नंतर पुढील प्रक्रियेसाठी बंगळुरू येथे पाठवली जाते. तेथे प्रक्रिया झाल्यानंतर परदेशात जाऊन तिथे या काकडीचे लोणचे तयार होते. त्याचे पॉकेट बनवून परदेशासह अनेक ठिकाणी पाठवले जाते, अशी माहिती हा प्लांट चालवणारे निमदेव यांनी सांगितले.

हेही वाचा - केलवड गावात विहिरीत आढळला शेतकऱ्याचा मृतदेह, परिसरात खळबळ
काकडीसाठी जिल्ह्यातील वातावरण लाभदायक असल्याने कमी वेळात जास्त काकड्या वेलाला लागत आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात प्राथमिक प्रक्रियेबरोबर यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिल्यास या उद्योगाला चालना मिळेल. अनेकांना रोजगार उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना जास्त नफा मिळेल. जेणेकरून नापिकीला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि आत्महत्यांचा आकडा कमी होईल.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES