• A
  • A
  • A
अण्णांच्या उपोषणाला हिंगोलीतून समर्थन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासह ठिय्या आंदोलन

हिंगोली - राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांनी विविध मागण्यांसाठी ३० जानेवारीपासून सुरू केलेल्या उपोषणाला हिंगोलीतूनही पाठिंबा मिळत आहे. आजपासून हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलनच्यावतीने उपोषण व काही जणांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. या उपोषणाला अखिल भारतीय वारकरी मंडळाच्यावतीनेही पाठिंबा दिला आहे.


हेही वाचा - ठोस प्रस्ताव असल्याशिवाय मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्यांनी चर्चेस...
अण्णा हजारे यांच्या मागण्या या सर्वसामान्यांच्या हिताच्या असून यामुळे प्रशासनातील कामकाजात पारदर्शकता येणार आहे. त्याकडे मात्र केंद्र आणि राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे. या दुर्लक्षामुळे उपोषणास बसलेल्या अण्णा हजारेंची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यासच्या वतीने अजून काही दिवस प्रतिक्षा केली जाणार आहे. अजूनही सरकारने उपोषणाकडे दुर्लक्ष कायम ठेवले, तर आम्ही उपोषणकर्ते रस्त्यावर उतरणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी 'ईनाडू इंडिया'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा - अण्णा हजारेंचा सरकारला इशारा, पद्मभूषण पुरस्कार करणार परत
उपोषणस्थळी माजी आमदार दगडू गलांडे, ज्ञानेश्वर घायतुडे, अशोक चव्हाण, फकीरराव नागरे, विश्वनाथ टोपारे, नंदकिशोर तोष्णीवाल आदी उपस्थित होते. दिवसेंदिवस या ठिकाणी उपोषणकर्त्यांची व आंदोनलकर्त्यांची संख्या वाढत आहे.

हेही वाचा - राज ठाकरे उद्या राळेगणसिद्धित, अण्णा हजारेंची घेणार भेट


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES