• A
  • A
  • A
आब्यांच्या झाडाला कुत्रीला दिली फाशी; हिंगोली जिल्ह्यातील घटना

हिंगोली - प्राणी हत्यांच्या विविध बातम्यामधून वन्य प्राण्यांच्या बाबतीत माणुसकी दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र सध्या पाहवायास मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यात याचाच पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. आंब्याच्या झाडाला एका जिवंत कुत्रीला फाशी देऊन लटकावण्यात आल्याची घटना समोर आली आहे.


हिंगोली जिल्ह्यातील खंडाळा येथे गावापासून काही अंतरावरच असलेल्या एका शेताच्या शिवारात ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या भागातील काही नागरिक त्या कुत्र्याच्या मालकाचा शोध घेत आहेत. या घटनेवरून मात्र प्राण्यांच्या बाबतीत माणुसकी कमी झाल्याचे चित्र पुन्हा एकदा अधोरेखित झाले असे म्हणावे लागेल. दरम्यान, या प्रकरणी संबधीत गुन्हेगाराला अटक करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES