• A
  • A
  • A
हिंगोलीत छत्रपतींच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण होणार, प्रशासनाकडून परिसराची पाहणी

हिंगोली - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ६ फेब्रुवारीला हिंगोली येथे होणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. त्यामुळे पुतळा परिसराची पाहणी शनिवारी पोलीस प्रशासनाने केली. तसेच, मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅडही तयार करण्यात आले आहे.


यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, पुतळा समितीचे अध्यक्ष माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे आदींची उपस्थिती होती.

हेलिकॉप्टर उतरणाऱ्या हेलिपॅडवर चुना लावून दिशा दाखविण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिल्या. तसेच मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी किती अंतरावर मान्यवर उपस्थित राहतील, तसेच कार्यक्रम स्थळी वाहने बिना अडथळ्याचे कसे पोहोचतील याचे संपूर्ण नियोजन केले. तसेच, नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करता येतो की नाही, याचे स्वतः जिल्हाधिकारी जयवंशी व पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी पुतळ्याजवळ जाऊन प्रात्यक्षिक करुन पाहिले.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES