• A
  • A
  • A
शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण

हिंगोली - शहरात मोठ्या प्रयत्नांनंतर बसविलेल्या शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यामुळे हिंगोलीकरामध्ये सध्या आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे. पुतळ्याचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले होते. आता सुशोभीकरण करण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे. ६ फेब्रुवारीला दुपारी १ च्या सुमारास पुतळ्याचे अनावर होणार असल्याने पुन्हा कामाची गती वाढली आहे. या पुतळ्यामुळे हिंगोलीच्या वैभवात नव्याने भर पडणार आहे.


हेही वाचा- रेशनच्या मालासाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्याची तब्येत बिघडली
हिंगोली येथे शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, मागच्या 3 ते 4 महिन्यांपासून केलेल्या प्रयत्नाला चांगलीच गती आली होती. यात कोणतेही राजकारण न करता पुतळा उभारण्याचे काम हाती घेतले. दोन वर्षांपासून छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास सुरुवात झाली. पुतळ्यासाठी जागाही विश्रामगृह परिसरात दर्शनीय भागात मिळाल्याने, शहरात ये-जा करणाऱ्यांचे येथील दृश्य पाहून डोळ्याचे पारणेच फिटणार आहे. या पुतळ्यासाठी आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांचे मोठे योगदान आहे. पुतळ्याचे अनावरण ६ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्याच्या हस्ते दुपारी १ वाजता होणार आहे. या नंतर रामलीला मैदानावरील शेतकरी मेळावा व बचत गट मेळाव्यात मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत.
हेही वाचा- संविधान वाचवू शकलो नाही, तर भयंकर परिस्थिती निर्माण होईल - अमोल मिटकरी
पुतळा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरणाची तयारी पूर्ण झाली असून, पुतळा अनावरण मोठ्या दिमाखात व्हावे यासाठी पुतळा समितीची तातडीची बैठक शनिवारी सकाळी १० वाजता होणार आहे. समितीच्या वतीने संपूर्ण आढावा घेण्यात आला असून सभेच्या ठिकाणाची पाहणी पूर्ण केली आहे. पुतळ्याचे अनावरण होताच शिवप्रेमींची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES