• A
  • A
  • A
हिंगोलीत गळ्याला चाकू लावून ९७ हजार लुटले; गुन्हा दाखल

हिंगोली - मागील २ ते ३ महिन्यापासून जिल्ह्यात रस्ता अडवून वाहने लुटण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशीच एक घटना गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. एका विना क्रमांकाच्या दुचाकीवर आलेल्या दोघांनी साबण घेऊन जाणाऱ्या वाहनाला अडवून लुटले. यावेळी चोरट्यांनी चालकाच्या गळ्याला चाकू लावून ९७ हजार रुपये लंपास केले. त्यानंतर तेथून पळ काढला. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा - परभणीत ६ लाखांच्या मुद्देमालासह तीन चोर गजाआड
हिंगोली येथील संतोष नेनवणी हे साबणाचे व्यावसायिक आहे. ते वाहनाद्वारे जिल्हाभरात सर्वत्र साबणांचा पुरवठा करतात. नेहमीप्रमाणे चालक संतोष पांडुरंग खांदवे आपल्या वाहनाने (एमएच ३८, ई २७०३) गोरेगाव या ठिकाणी साबण पोहोच केल्यानंतर ते त्यांच्या सहकाऱ्यासह वाहनाने कनेरगाव मार्गे आपल्या घरी येत होते. दरम्यान, कनेरगाव नाक्याजवळील मोप शिवारात एका दुचाकीस्वाराने त्याची गाडी वाहनाच्या समोर उभी केली. त्यानंतर एकाने हातात दगड घेतला. त्यामुळे संतोषने वाहन थांबवले. वाहन थांबवताच दोघे गाडी जवळ धावून गेले आणि त्याने चालकाच्या गळ्याला चाकू लावून रक्कमेची मागणी केली. चालकाने विरोध केला. मात्र, त्या चोरट्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे त्यांनी गाडीतील रक्कमेची बॅग दिली. या घटनेनंतर लगेच चोरट्याने गाडीची चावी घेऊन तेथून पळ काढला.

हेही वाचा - नमाजावेळी मशिदीत करायचे चोरी, बाहेर पडताना मागायचे अल्लाची माफी
घटनेची माहिती चालक संतोष खांदवे याने मालकाला कळवली. मालकाने पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यामुळे घटनेची माहिती मिळताच कनेरगाव नाका पोलीस चौकीचे मोहन धाबे, विजय महाले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना दिली. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक बालाजी तीप्पलवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.

जिल्ह्यात वाहने अडवून पैसे लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विषेश करून गोरेगाव आणि सेनगाव पोलीस ठाणे हद्दीतच सर्वाधिक जास्त घटना वाढत आहेत. अजून एकही आरोपी पोलिसांच्या हाताला लागला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. सायंकाळच्या वेळी या भागात वाहनावरून ये-जा करणे धोक्याचे ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES