• A
  • A
  • A
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश सोळंके यांच्या घरात चोरी

बीड - माजलगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या केसापुरी कॅम्प परिसरातील बंगल्यातून तीन लाखाची चोरी झाल्याची घटना सोमवारी समोर आली. या घटनेचा तपास माजलगाव पोलीस करत असून त्यांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आहे.


हेही वाचा - मुंडे बहीण-भाऊ एकाच व्यासपीठावर; राजकीय फटकेबाजीला दिली बगल
माजलगाव जवळच केसापूरी शिवारात मंत्री प्रकाश सोळंके यांचा बंगला आहे. मागच्या ३ दिवसांपासून माजी मंत्री सोळंके व त्यांच्या पत्नी मंगल सोळंके यांच्यासह संपूर्ण कुटुंबीय लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा घेऊन सोळंके यांच्या बेडरूममधील कपाटातून तीन लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोळंके यांच्या विश्वासू नोकराला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची माजलगाव पोलीस कसून चौकशी करत आहेत.
हेही वाचा - नांदा सौख्य भरे; बीडमध्ये 'सखी सेल'च्या माध्यमातून पोलिसांनी उभारले मोडलेले संसार
माजलगाव पोलिसांनी चौकशीसाठी सोळंके यांच्या बंगल्यावरील दोन नोकरांना ताब्यात घेतले आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES