• A
  • A
  • A
मुंडे बहीण-भाऊ एकाच व्यासपीठावर; राजकीय फटकेबाजीला दिली बगल

बीड - राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे बीडचे मुंडे-बहीण भाऊ रविवारी परळी येथे एकाच व्यासपीठावर आले. यावेळी राजकीय फटकेबाजी होणारच, अशी अपेक्षा उपस्थित कार्यकर्त्यांना होती. मात्र, मंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात राजकीय फटकेबाजीला बगल दिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.


बीड जिल्ह्यातील परळी येथील ज्येष्ठ गुरुवर्य आबासाहेब गणपतराव वाघमारे यांच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त मंत्री पंकजा मुंडे व विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची रविवारी उपस्थिती होती. रविवारी दोघे बहिण-भाऊ राजकीय फटकेबाजी करणारच अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मोठी गर्दी झाली. कार्यक्रमात पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांची भाषणे झाली. मात्र, दोघांच्याही भाषणात राजकीय शब्द देखील उच्चारला गेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना राजकीय फटकेबाजीचा अनुभव घेता आला नाही.
हेही वाचा- जातीचं नाव काढणाऱ्यांना मी ठोकून काढेन - नितीन गडकरी
यावेळी गुरुवर्य आबासाहेब वाघमारे यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुरुवर्य वाघमारे यांच्या जीवन चरित्रावर ध्वनिचित्रफीत प्रदर्शित करण्यात आली.
हेही वाचा- लखनौ विमानतळापासून पक्षाच्या कार्यालयापर्यंत प्रियंका आणि राहुल गांधींचा 'रोड शो' सुरू

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES