• A
  • A
  • A
नांदा सौख्य भरे; बीडमध्ये 'सखी सेल'च्या माध्यमातून पोलिसांनी उभारले मोडलेले संसार

बीड - कुटुंब म्हटले की भांडण, कुरबुरी येणारच. मात्र, याच छोट्यामोठ्या कारणांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. यामुळे मुलाबाळांचीही त्रेधातिरपट उडते. अशा घटना टाळण्यासाठी जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात 'सखी सेल'ची स्थापना करण्यात आली आहे. या सखी सेलच्या अंतर्गत पोलिसांनी ५० जोडप्यांना पुन्हा एकत्र आणले आहे.


बीड जिल्हा पोलीस दलाने 'सखी सेल'च्या माध्यमातून मागील वर्षभरात ३५० जोडप्यांचे मोडलेले संसार पुन्हा उभारण्याची किमया करून दाखवली आहे. ज्या जोडप्यांमध्ये मागील ३-४ वर्षांपासून भांडण सुरू होते, अशा जोडप्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयातील 'सखी सेल'च्या माध्यमातून समुपदेशन करण्यात आले.
यापैकी ५० जोडप्यांचा साडीचोळी, टॉवेल टोपी देऊन सत्कार करण्यात आला. जोडप्यांनीदेखील 'झाले गेले विसरून जाऊ, जरा विसावू या वळणावर', असे म्हणत मनातील कटू आठवणींवर पडदा टाकत पोलिसांचा निरोप घेतला. यावेळी पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक वैभव स्थानिक गुन्हे शाखेचे घनश्याम पाळवदे सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे हे उपस्थित होते.
हेही वाचा-बेरोजगार तरुणाने सुरू केला चहाचा व्यवसाय, चहाच्या गाड्याला दिले 'हे' नाव
यावेळी अनेक जोडप्यांनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये मीरा पद्माकर हावळे या महिलेने म्हटले, की घरातील शुल्लक वादावरून आम्ही विभक्त झालो होतो. सतत होणाऱ्या कुरबुरी यामुळे आमच्या दोघांमध्ये दुरावा वाढत गेला. काही नातेवाईकांमुळेही आमच्या पती-पत्नीचा वाद विकोपाला गेला. त्यामुळे न्यायालयातून सोडचिठ्ठी घेण्याच्या तयारीत होतो. मात्र, शेवटचा एक प्रयत्न म्हणून जिल्हा पोलीस दलाच्या 'सखी सेल'मध्ये एक अर्ज देऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले. 'सखी सेल'च्या माध्यमातून जे समुपदेशन झाले, त्यामुळे आम्हाला आमच्या चुका लक्षात आल्या. आम्ही जुन्या वादावर पडदा टाकून नव्याने आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पोलिसांनी आमच्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले. ते आमच्यासाठी मोलाचे ठरले, असेही मीरा हावळे म्हणाल्या.
अनेक जोडप्यांची मुलेही यावेळी त्यांच्यासोबत होते. अखेर 'नांदा सौख्यभरे, असे म्हणत अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी उपस्थित जोडप्यांना मार्गदर्शन केले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES