• A
  • A
  • A
चारित्र्याच्या संशयावरून माजलगावमध्ये पत्नीचा गळा दाबून खून

बीड - चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. ही घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील मॅनकॉट जिनींगमध्ये शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. उषा गणेश ढवळे (वय २२, रा.शेलगाव देशमुख ता. मेहकर जि. बुलढाणा ह.मु माजलगााव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. गणेश ढवळे या आरोपीला पोलिसांनी एका तासात बेड्या ठोकल्या आहेत.


हेही वाचा -बेरोजगार तरुणाने सुरू केला चहाचा व्यवसाय, चहाच्या गाड्याला दिले 'हे' नाव
उषा व गणेश ढवळे हे दाम्पत्य कामगार आहे. मागील काही दिवसांपासून ते कामासाठी माजलगावला आले होते. शहरातीलच मॅनकॉट जिनींगवर काम करून उदरनिर्वाह करत होते. गणेशचा पत्नीवर नेहमी संशय असे. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो तिला मारहाण करण्याबरोबरच तिचा शारिरीक व मानसिक छळ करीत होता. याच संशयातून शनिवारी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यातच गणेशने उषाचा गळा दाबून खून केला.

हेही वाचा -'आम्ही जगावं की मरावं' तुर उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा प्रशासनाला सवाल
याची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी घटनास्थळी धाव घेतली. पतीवर संशय आल्याने त्यांनी तत्काळ पथके रवाना केली आणि अवघ्या तासाभरात गणेशला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा कबूल केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगितले जात आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES