• A
  • A
  • A
'आम्ही जगावं की मरावं' तुर उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा प्रशासनाला सवाल

बीड- शासकीय खरेदी केंद्रावर तुर विकून एक वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे, तरीदेखील आमच्या तुरीचे पैसे शासनाने आम्हाला दिले नाहीत. अशा दुष्काळी परिस्थितीत आमची हेळसांड होत आहे. 'आम्ही जगावं की मरावं' असा प्रश्न उपस्थित करत बुधवारी बीड जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली होती. सरकारच्या या धोरणाबाबत यावेळी शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.


बीड जिल्ह्यात सातत्याने दुष्काळाचे चित्र आहे. २०१७ मध्ये थोड्याफार पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. या बिकट परिस्थितीत हाती आलेले पीक चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी घातले. यामध्ये २०१७ वर्षात तूर २३ हजार ६९८ क्विंटल तर हरभरा १० हजार ३६५ क्विंटल खरेदी शासकीय खरेदी केंद्रावर झाली. खरेदी झाल्यानंतर वर्षभराचा कालावधी उलटला आहे. तरीदेखील पणन महासंघाकडून संबंधित तूर उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. शेतकरी दर आठवड्याला बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चकरा मारत आहेत. मात्र, तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हातावर शासन व प्रशासनाने तुरी दिल्या असल्याचे शेतकरी नंदकिशोर तेलप, प्रकाश राठोड, विष्णू राठोड, युवराज घोलप या शेतकऱ्यांनी सांगितले.
वाचा- उजनी येथे दुधातून विषबाधा; जुळ्या बहिणींचा मृत्यू, दोघींची प्रकृती गंभीर
शेतकरी नेते कालिदास आपेट यांनी यावेळी सांगितले की, बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने बळीराजा आर्थिक अडचणीत आहे. असे असताना देखील शासन तूर उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे दीड वर्ष झाले तरी देत नाही. हे चुकीचे धोरण असून याचा मोठा फटका बीड जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना बसत आहे. याची दखल बीड जिल्हाधिकारी एम. डी . सिंह यांनी घ्यावी, अशी मागणी शेतकरी नेते कालिदास आपेट यांनी केली आहे.

वाचा- बीडमधील गर्भपात प्रकरणः तिघे दोषी; डॉक्टर दाम्पत्याला १० वर्षांची शिक्षाCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES