• A
  • A
  • A
बीडमध्ये दुष्काळाच्या झळा तीव्र; टँकरची संख्या ३३७ वर

बीड - जिल्ह्यातील दुष्काळाच्या झळा आणखीनच तीव्र झाल्या आहेत. हंडाभर पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी पशुपालकांची भटकंती हे चित्र बीड जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या बीड जिल्ह्यातील २७१ गावे तर १२१ वाड्या टंचाईच्या झळा भोगत आहेत. शासनाने या सर्व गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असून बीड जिल्ह्यातील टँकरची संख्या ३३७ वर पोहोचली आहे.


हेही वाचा - जिल्ह्यातील साठवण तलावात अत्यल्प पाणीसाठा
सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे पाणी पातळी ७ मीटरने खालावल्याचे भूजल विभागाच्या अहवालात म्हटले आहे. बीड जिल्ह्यातून साडे सहा ते सात लाख ऊसतोड मजूर परराज्यात ऊस तोडणीसाठी गेलेले आहेत. साखर कारखाने बंद झाल्यावर महिनाभरात ऊसतोड मजूर पुन्हा जिल्ह्यात परतल्यावर त्यांना पाणी द्यायचे कुठून असा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर आहे.
बीड जिल्ह्यातील तालुक्‍याच्या ठिकाणापासून जवळ असलेल्या गावामध्ये गावकऱयांना पाणी विकत घ्यावे लागत असल्याची वस्तुस्थिती बीड जिल्ह्यात आहे. धारुर तालुक्यातील गोपाळपूर येथे देखील पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय बीड जवळील तळेगाव येथे देखील टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
हेही वाचा - बीडच्या बेदरवाडीची चित्तरकथा; निधनानंतरही सोसाव्या लागतायेत टंचाईच्या...
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच ९५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. जिल्ह्यात एकूण ५०९ पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अधिग्रहित केले असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. शहरी व ग्रामीण भागातील एकूण ५ लाख ५१ हजार नागरिकांना जिल्हा प्रशासन टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवत आहे. ही परिस्थिती जून महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे.
हेही वाचा - पाण्यासाठी २६ जानेवारीला विहिरीत उड्या घेऊन आत्महत्या करण्याचा...

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES