• A
  • A
  • A
बीडमधील गर्भपात प्रकरणः तिघे दोषी; डॉक्टर दाम्पत्याला १० वर्षांची शिक्षा

बीड - परळीतल्या बेकायदेशीर गर्भपात आणि स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणातील आरोपींना बीड न्यायायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणात न्यायालयात डॉक्टर दाम्पत्यासह मृत महिलेच्या पतीला १० वर्षांची शिक्षा सुूनावली आहे. मे २०१२ मध्ये परळीत सुदाम मुंडेच्या रुग्णालयात विजयमाला पटेकर या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला होता. दरम्यान, या प्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने मुंडे दाम्पत्याचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला आहे.

सुदाम मुंडे


परळीत बेकायदेशीर गर्भपात करताना महिलेचा मृत्यू झाला होता. मे २०१२ या वर्षी ही घटना घडली होती. या प्रकरणी कलम ३०४, ३१२, ३१४, ३१५ आणि ३१६ नुसार गुन्हा दाखल झाला होता. यात पीसीपीएनडीटी आणि एमटीबी अॅक्ट सेक्शन ३ A, सेक्शन ९, सेक्शन १७, सेक्शन २९ नुसार गुन्हा दाखल झाला होता. याचबरोबर एमटीबी कायद्यानुसार सेक्शन ४ व ६ अन्वये गुन्हा या बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या मुंडे डॉक्टर दाम्पत्यावर दाखल झाला होता.
या प्रकरणी २०१५ मध्ये परळी न्यायालयाने मुंडे दाम्पत्याला वेगवेगळ्या कलमांखाली प्रत्येकी एकूण ४८ महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली होती.
हेही वाचा - टिप्परमधील गाळ अंगावर पडल्याने दोघांचा झोपेतच मृत्यू
या प्रकरणामध्ये एकूण १७ आरोपी होते. त्यातल्या जळगावच्या डॉ. राहुल कोल्हे यांचे अपघाती निधन झाले होते. इतर दोघांचाही दरम्यानच्या काळात मृत्यू झाला होता. या प्रकरणी उर्वरित ११ जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह डॉक्टर दाम्पत्याला न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सध्या मृत महिलेचा पती आरोपी महादेव पाटकर हा फरार आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए . एस . गांधी यांनी ही शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी शवविच्छेदन करणारे डॉ. पी. आय. गाडेकर तसेच सरकारी पंचाची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी पक्षाकडून युक्तिवाद करणाऱ्या अॅड. मिलिंद वाघीरकर यांनी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. यानुसार न्यायालयाने आरोपी सुदाम मुंडे, सरस्वती मुंडे तसेच फरार आरोपी महादेव पटेकर या तिघांना १० वर्षांची शिक्षा व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने मुंडे दाम्पत्याचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला आहे.
सुदाम मुंडेची अब्जावधींची माया
सुदाम मुंडेने स्त्री भ्रूणहत्येच्या या कृष्णकृत्यातून अब्जावधीची माया जमा केली. शेतकऱ्याचा मुलगा ते अब्जाधीश हा प्रवास त्याने नेमका केला तरी कसा...
डॉक्टर सुदाम मुंडे (वय ६१ वर्षे) एकनाथ मुंडे या शेतकऱ्याचा मुलगा. घरी पाच भावंडे. परळीपासून ५ किलोमीटरवर सारडगाव. प्राथमिक शिक्षणात चुणूक दाखवून सुदामनं औरंगाबादमधून डॉक्टरकीची पदवी मिळवली आणि परळीच्या सुभाष चौकात छोटसे क्लिनिक सुरु केले.
सुदामचे नाव पंचक्रोशीत पसरले. यथावकाश सुदामचे स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या सरस्वतीशी लग्न झाले. मग हळूहळू सुदामला सापडला शॉर्टकटने पैसे कमावण्याचा मार्ग. बायको सरस्वतीच्या नावाने सोनोग्राफी केंद्र सुरु केले. सोनोग्राफी मशिनमधून गर्भ पाहायचा आणि मुलगी असली की गर्भात कत्तल करायची.
मुलींची गर्भातच हत्या करुन सुदाम मुंडेकडे प्रचंड संपत्ती कमावली. त्यातून परळीच्या बस स्थानकांसमोर पाच मजली टोलेजंग रुग्णालय उभे राहिले. परळी परिसरात मुंडे दाम्पत्याने थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल ३५० एकर जमीन वेगवेगळ्या नातलगांच्या नावावर खरेदी केल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार कर्नाटक, गुजरातसह सांगली, साताऱ्यातूनही सुदाम मुंडेकडे दररोज ५० रुग्ण यायचे. फी होती प्रति रुग्ण २० हजार रुपये. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सुदाम मुंडेने चक्क प्रिस्क्रीप्शन प्रिंट करुन घेतली होती.
फरार मुंडे दाम्पत्याच्या काळ्या धंद्याची चर्चा ५ वर्षापासून सुरु होती. मग प्रशासनाने त्याच्यावर आजवर कारवाई का केली नाही? सुदामच्या धंद्यांना कुणाचे राजकीय पाठबळ होते का? वैद्यनाथाचे परळी गर्भपाताचे सेंटर बनले त्याला जबाबदार कोण? हे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES