टिप्परमधील गाळ अंगावर पडल्याने दोघांचा झोपेतच मृत्यू
बीड - शेतात झोपलेल्या दोघांच्या अंगावर टिप्परमधील गाळ पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी पहाटे केज तालुक्यातील भाटुंबा येथे घडली. भाटुंबा शेजारील एका पाझर तलावातील गाळ उपसून टिप्परने शेतात टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी शेतात झोपलेल्या दोघांच्या अंगावर अंधारातच गाळाचे टिप्पर चालकाने खाली केले. यामुळे ही घटना घडली.
हेही वाचा - भंडाऱ्यात वाळूच्या ढिगार्याखाली पुन्हा सापडला एक मृतदेह सर्जेराव बब्रुवान धपाटे, परमेश्वर हरिदास धपाटे, अशी मृतांची नावे आहेत. सर्जेराव आणि परमेश्वर नात्याने चुलते पुतणे आहेत. भाटुंबा शिवारातील त्यांच्या शेतात सर्जेराव आणि परमेश्वर झोपले होते. भाटुंबा परिसरातील एका पाझर तलावातील गाळ उपसून शेतात टाकण्याचे काम सुरू होते. गुरुवारी पहाटे टिप्पर चालक गाळ घेऊन आला आणि त्याने शेतात खाली केला. यावेळी सर्जेराव आणि परमेश्वर झोपेत होते. त्यामुळे टिप्परमधील गाळ त्यांच्या अंगावर पडला आणि दबून त्या दोघांचाही मृत्यू झाला.
हेही वाचा - प्रेमीयुगुलाची आत्महत्या; २ दिवसांपासून होते बेपत्ता, विहिरीत आढळले... या प्रकरणात पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह केज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. संबंधित टिप्पर चालक फरार झाला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणामुळे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्जेराव बब्रुवान धपाटे, यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे तर परमेश्वर धपाटे हा अविवाहित होता.