• A
  • A
  • A
विकासाच्या आड येणाऱ्यांना अरबी समुद्रात फेकून देणार, पंकजांची विरोधकांना धमकी

बीड - पालकमंत्री म्हणून काम करताना संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी निधी दिला. सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पक्ष, संघटना असा भेदभाव केला नाही. त्यामुळे आता जिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्यांना बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकून देईल, अशी धमकी पालकमंत्री पंकजा मुंडेंनी विरोधकांना दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १० हजार कोटी रुपयांची विकासकामे झाल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला.


बुधवारी बीड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नगरपरिषदेचा कार्यक्रम पार पाडला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. मुंडे यावेळी बोलताना म्हणाल्या, की दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा वारसा घेऊन आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत आहोत. राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक प्राधान्य देण्याची आमची भूमिका आहे. असे असताना मागच्या ४ वर्षात ज्या प्रमाणात विकासनिधी बीड जिल्ह्यासाठी खेचून आणला, एवढा निधी यापूर्वी कधीही जिल्ह्याला मिळाला नव्हता. बीड जिल्ह्यातील जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही सार्थ करण्याचा प्रयत्न करत आहोत. यापुढच्या काळातही बीड शहराच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास मुंडे यांनी उपस्थित बीडकरांना दिला.
हेही वाचा - स्थानिक राजकारणाला बगल देत मुख्यमंत्र्यांनी साधला बीडकरांशी संवाद

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून डॉ. प्रीतम मुंडे रिंगणात आहेत. राष्ट्रवादीकडे मात्र उमेदवारच नाही. त्यांचा अजूनही उमेदवार ठरला नाही. रोज एकाचे नाव पुढे केले जात आहे. अजून सक्षम उमेदवार त्यांना मिळत नाही, असे चित्र पाहायला मिळत आहे, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर, भाजपचे आमदार सुरेश धस, आमदार आर. टी. देशमुख आमदार भीमराव धोंडे आदींची उपस्थिती होती.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES