• A
  • A
  • A
राष्ट्रवादी म्हणजे घरफोडी सहकारी संस्था; सुरेश धस यांचा अजित पवारांना टोला

बीड - स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी घराघरात गावागावात भांडण लावून मते मिळवायची. एवढेच नाही तर राष्ट्रवादी पक्ष म्हणजे, घरफोडी सहकारी संस्था झाली आहे, असा टोला माजी मंत्री आ. सुरेश धस यांनी कोणाचेही नाव न घेता अजित पवार यांना लगावला.

संग्रहित छायाचित्र


हेही वाचा - मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू
बीड येथे नगरपालिकेच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री पंकजा मुंडे, आमदार जयदत्त क्षीरसागर, डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार सुरेश धस यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, की आता बीड जिल्ह्यात मागील चार साडेचार वर्षाच्या काळात पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून 10 हजार कोटी रुपये निधी आणला. अनेक गावांमधील रस्ते पक्के केले पिण्याच्या पाण्‍यासाठी विहिरी दिल्या राहण्यासाठी घरे दिली कोट्यावधी रुपये विकास कामावर खर्च झाले. जेव्हा आम्ही पूर्वीच्या सरकारमध्ये मंत्री होतो तेव्हा दीड-दोन कोटी रुपयांचा निधी दिला की पुन्हा विकास कामांसाठी पैसे मागायचे नाही, असा नियमच घालून दिला जायचा. आता मात्र बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात कायापालट होत असल्याचा विश्वास आमदार धस यांनी यावेळी दिला.
हेही वाचा - आता कौमार्य चाचणी केल्यास होणार गुन्हा दाखल; लवकरच अधिसुचना काढणार
बीड जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे गोरगरिबांना हाताला काम आणि खाण्यासाठी धान्य देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक विचार करावा, असे मत धस यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी उपस्थित नागरिकांशी पालकमंत्री पंकजा मुंडे आ. जयदत्त क्षीरसागर व डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी संवाद साधला.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES