• A
  • A
  • A
स्थानिक राजकारणाला बगल देत मुख्यमंत्र्यांनी साधला बीडकरांशी संवाद

बीड - दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे व केशरकाकू क्षीरसागर यांचा हा जिल्हा आहे. बीड जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी जे-जे करण्याची गरज असेल ते-ते आम्ही सरकार म्हणून करु. जनावरे जगवण्यासाठी छावण्यांच्या अटी जाचक वाटत असतील, तर त्यामध्ये बदल करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. स्थानिक राजकारणाला बगल देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडकरांशी संवाद साधला.


हेही वाचा -बीडच्या दरडवाडीत ३ दिवस रंगणार भारूड महोत्सव; एनएसडीचे माजी संचालक वामन केंद्रेंची माहिती
बीड नगरपालिकेच्या वतीने आयोजित विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर आमदार सुरेश धस आमदार भीमराव धोंडे, नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुठल्याही शहरात मूलभूत सुविधा मिळत असतील तरच त्या शहरात उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात उभे राहतात. त्याच दृष्टीने आम्ही बीड नगरपालिकेला मागच्या चार वर्षांच्या काळात विकासासाठी ४९० कोटी रुपये निधी बीडचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्या माध्यमातून दिला आहे. बीडच्या विकासासाठी आम्ही कुठल्याही पक्षाचा विचार केलेला नाही. बीड जिल्हा गोपीनाथ मुंडे साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसेच स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर यांनीदेखील राज्यस्तरावर अनेक वर्षे नेतृत्व केले आहे. म्हणून आम्ही बीडच्या विकासाला प्राधान्य देत आहोत.

हेही वाचा -बीडमध्ये तरुणांना व्यसनाच्या खाईत लोटणाऱ्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई
शहरात उद्योग वाढले तरच तरुणांच्या हाताला काम मिळेल याशिवाय गरिबांना घरे देण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हजारो बेघरांना घरे दिलेली आहेत. सध्या दुष्काळी परिस्थिती आहे हे लक्षात घेऊन मोदी सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या दृष्टीने सहा हजार रुपये देण्याची योजना जाहीर केली आहे. हे पैसे १५ मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोण कुठल्या पक्षात आहे यापेक्षा विकासाला प्राधान्य - आमदार क्षीरसागर
बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कोणाचीही पायरी चढू, अशी भूमिका स्पष्ट करत, स्थानिक राजकारणात जोडे बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी विविध योजनांसाठी निधीची तरतूद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर जाहीर भाषणामधून केली. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने ग्रामीण भागातील गोरगरिबांना १० किलो तांदूळ व १५ किलो गहू त्याचबरोबर नगरोत्थानासाठी शंभर कोटीचा दुसरा टप्पा द्यावा, अशी मागणी क्षीरसागर यांनी भाषणामधून केली.

हेही वाचा -
येणाऱ्या काळात विकास हेच आमचे ध्येय असेल अशी भूमिका क्षीरसागर यांनी घेतली कुठलेही राजकीय भाषण करण्याचे त्यांनी टाळले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आमदार सुरेश धस यांनी मात्र, जोरदार फटकेबाजी केली. राष्ट्रवादीवर टीका करताना म्हटले की, राष्ट्रवादी पक्ष हा घरफोडी सहकारी संस्था झाला आहे. महाराष्ट्रात अनेकांचे घर त्यांनी फोडले असल्याचा आरोप आमदार धस यांनी केला.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES