• A
  • A
  • A
बीडमध्ये तरुणांना व्यसनाच्या खाईत लोटणाऱ्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई

बीड- हातभट्टी दारू तयार करून विक्री करणाऱ्या एका व्यक्ती विरोधात महाराष्ट्र धोकादायक कारवाया प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मंगळवारी केली. अटक करून आरोपीची रवानगी औरंगाबाद येथील हरसुल कारागृहात करण्यात आली आहे.


अच्युत तुकाराम मेंडके (रा. सिरसाळा, ता.परळी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अवैध दारू बनविणे, विक्री करणे असे अनेक गुन्हे सिरसाळा ठाण्यात दाखल आहेत. मात्र, अटकेनंतर जामिनावर सुटल्यानंतर त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. अवैध दारू विक्री करण्यामुळे परळी तालुक्यातील सिरसाळा परिसरातील तरुण पिढी व्यसनाधीन झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याच्यावर एमपीडीएनुसार कारवाईचा प्रस्ताव सिरसाळा ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक साहेबराव राठोड यांनी अप्पर अधीक्षक अजित बोराडे, उपाधीक्षक भास्कर सावंत, गुन्हे शाखेचे निरीक्षक घनश्याम माळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक श्रीधर यांच्याकडे पाठविला होता. अधीक्षकांच्या शिफारशीने प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला होता. यावर जिल्हाधिकारी सिंह यांनी १९ जानेवारी रोजी पुढील कारवाईचे आदेश दिले होते.

वाचा- बुर्किना फासोत जिहादी हल्ल्यात १४ ठार; १४६ दहशतवाद्यांना कंठस्नान
जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनुसार आरोपीला मंगळवारी जेरबंद करून त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. ही कारवाई सिरसाळा ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक साहेबराव राठोड सहाय्यक फौजदार जनकपुरी रामराव गडदे यांनी केली.

वाचा- लग्नाच्या ८ दिवस अगोदरच तरुणीवर काळाचा घाला; केळवण करून परतताना अपघात
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES