• A
  • A
  • A
ज्यांच्याकडून आम्ही कामे मंजूर केली, त्यांनाच उद्घाटनासाठी निमंत्रण - आमदार क्षीरसागर

बीड - शहराच्या विकासासाठी मागील ४ वर्षात तीनशे कोटीहून अधिक कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजूर करून घेण्याचे काम बीड नगरपालिकेने केलेले आहे. आता झालेल्या कामांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ६ फेब्रुवारी रोजी करण्यात येत आहे. हा कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्थेचा आहे. याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी घेतली. ते सोमवारी पत्रकारांशी बोलत होते.


हेही वाचा-माझ्या वडिलांचे काही झाले असेल तर त्याचा जीव घेईन - पंकजा मुंडे
बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुखावलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्ताने क्षीरसागर राजकीय भूमिका घेतात की, काय असे अनेकांना वाटत होते. मात्र, क्षीरसागर यांची राजकीय भूमिका गुलदस्त्यातच असल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. क्षीरसागर यांचे बंधू डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या ताब्यात बीड नगरपालिका आहे. नगराध्यक्ष म्हणून ते काम पाहतात. मागच्या ४ वर्षात शहरासाठी विविध विकास कामे बीड नगरपालिका अंतर्गत करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे भुयारी गटार योजना कार्यान्वित केली जात आहे. या योजनेच्या शुभारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केले आहे.

मागील तीन वर्षापासून क्षीरसागर राष्ट्रवादीपासून दुखावलेले असल्याने त्यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढवली आहे. अनेक वर्षापासून आमदार क्षीरसागर राष्ट्रवादीचा अनेक कार्यक्रमांपासून दूर असल्याचे देखील पाहायला मिळालेले आहे. अशा परिस्थितीत ६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आमदार क्षीरसागर राजकीय भूमिका स्वतंत्रपणे घेतात की, काय अशी शक्यता अनेकांना वाटत होती. मात्र, त्यांची राजकीय भूमिका गुलदस्त्यातच आहे.
बीडच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांचे सहकार्य लाभले असल्याचे क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. बीड शहरातील विविध विकास कामांना विकास कामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करणार असल्याचे सांगते पुढे म्हणाले की, हा कार्यक्रम एका स्थानिक स्वराज्य संस्थेचा आहे त्यामुळे या कार्यक्रमाला कोणीही राजकीय समजू नये बीड शहराच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी ज्यांनी काम मंजूर केली त्यांनाच आपण योजनांच्या उद्घाटनासाठी बोलत आहोत. हा कार्यक्रम राजकीय नसल्याचे स्पष्ट करून आमदार क्षीरसागर यांनी आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली असल्याने विरोधकांमध्ये आणखीनच संभ्रम निर्माण झाला आहे.
हेही वाचा-वडवणीच्या ज्ञानगंगा वसतिगृहातील १४ विद्यार्थ्यांना विषबाधा; प्रकृती धोक्याबाहेरCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES