• A
  • A
  • A
माझ्या वडिलांचे काही झाले असेल तर त्याचा जीव घेईन - पंकजा मुंडे

बीड - माझ्या वडिलांचे काही झाले असेल तर त्याचा मी जीव घेईन, तेवढी ताकद माझ्यात असल्याचे वक्तव्य महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडेंनी केले आहे. केस तालुक्यातील नांदूर घाट येथे एका विकास कामाच्या शुभारंभप्रसंगी मुंडे बोलत होत्या.पंधरा दिवसापूर्वी एका हॅकर्सने गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत वादग्रस्त माहिती पत्रकार परिषदेत दिली होती. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी माझ्या वडिलांच्या मृत्यूचे भांडवल करू नका अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली होती. मात्र, आज त्यांनी पुन्हा गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत वक्तव्य केले. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यू बाबत चौकशी करायची तर तुमच्यापासूनच (विरोध करणाऱ्या) करावी लागेल असे वक्तव्य केले. त्यामुळे पुन्हा पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत वाद निर्माण केला आहे. गोपीनाथ मुंडेच्या मृत्यूबाबत राजकारण करू नका म्हणणाऱ्या पंकजा मुंडेंनी स्वत:च राजकारण करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
बीड जिल्ह्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा विकास निधी मी आणलेला आहे. येणाऱ्या काळात हा जिल्हा तुम्हाला संभाळायचा आहे. मला राज्याची व केंद्राची जबाबदारी मिळू शकते. मला प्रचारासाठी सर्वत्र फिरावे लागेल. त्यामुळे प्रीतम मुंडेंना मी तुमच्या ओटीत टाकत असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी आमदार संगीता ठोंबरे, समाज कल्याण सभापती संतोष हंगे आदींची उपस्थिती होती.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES